औरंगाबाद येथे जिल्ह्यात आज एकूण 130 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

औरंगाबाद, दि.26  : औरंगाबाद जिल्ह्यात आज 377 जणांना (मनपा 316, ग्रामीण 61) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 8536 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 130 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 13038  झाली आहे. आजपर्यंत एकूण 443 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4059 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 
दुपारनंतर 84 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 37, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 44 आढळलेले आहेत. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे  (कंसात रुग्ण संख्या) आहे. 
*सिटी एंट्री पॉइंटवरील रुग्ण (37)*  
मयूर पार्क (4), वाळूज सिडको (2), सिडको महानगर (1), छावणी (1), शेंदूरवादा (1), अन्य (7),  तीस ग्रीन स्कीम, पैठण रोड (2), रांजणगाव  (4), बीड बायपास (2), बजाज नगर (1), सावंगी (4), सिल्लोड (2), देवळाई (1), शेंद्रा एमआयडीसी (3), एन नऊ प्रताप नगर (2) 
*मनपा हद्दीतील रुग्ण (03)*
उस्मानपुरा (1), एन नऊ पवन नगर (1), एन दोन सिडको (1)
*कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू* 
घाटीत खुलताबादेतील 60 वर्षीय स्त्री कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Post a comment

0 Comments