सावधान ! कोविड 19 बद्दल अफवा केल्यास कारवाई करणार तहसीलदारां च इशारा


वैजापूर (प्रतिनिधी)/ राहुल त्रिभुवन

वैजापुरात कोरोना ने थैमान घातले असून अफवांना सुद्धा बळ आले आहे.गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची साखळी खंडित व्हावी म्हणून वैजापूर प्रशासनान चांगल्या पद्धतीने काम करताना दिसून येत असेल. यामध्ये पोलीस प्रशासन,वैद्यकीय तसेच तहसिल,नगरपालिका व लोकप्रतिनिधी यांचा सुद्धा या मध्ये प्रामुख्याने सहभाग बघावयास मिळतो. कोरोनाची साखळी खंडित व्हावी म्हणून रॅपिड टेस्टिंग करण्याचा निर्णय वैजापूर प्रशासनाने घेतला असून या मार्फत बऱ्याच प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.त्यामुळे काही  प्रमाणात वैजापूर शहरात व ग्रामिण भागात  रॅपिड टेस्टिंग बद्दल व कोरोना बद्दल अफवा पसरवायला सुरुवात झालेली असल्याने 
तहसील कार्यालय अंतर्गत  तहसिलदार निखिल धुळधर यांनी   नागरिक व पत्रकार यांना सूचित करताना असे म्हटले की कोविड १९ ( कोरोना ) या साथ रोग अनुषंगाने समाज माध्यम तसेच वृत्तपत्रांतून अनेक बातम्या प्रसिद्ध होत असून कोविड १९ साथरोग विषयी काही अफवा देखील पसरविण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.पण त्यामागील सत्यता पडताळून न पाहता चुकीच्या पद्धतीने माहिती पसरविण्यात येत आहे त्यामुळे माहिती सत्य नसल्यास किंवा अफवा पसरविल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आव्हाहन केले.
  वैजापूर तालुक्यातील झालेल्या रॅपिड अँटिजन चाचणी मध्ये पहिले पॉझिटिव्ह आलेला रुग्ण स्वॅब चाचणी मध्ये निगेटिव्ह आला असल्याचे आशयाची बातमी वृत्तपत्र तसेच समाज माध्यमातून प्रसिध्द झाली होती. सदर बातमी ही संबंधित रुग्णाने गैरसमजुती मधून दिलेल्या माहितीमुळे प्रसिध्द झाल्याचे दिसून आले.
 सदर रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आलेला नव्हता,   निश्चित निष्कर्ष न काढता येत  असल्यामुळे प्रशासनाने आर टी पी सी आर द्वारे पुन्हा तपासणी केली ती निगेटिव्ह आढळून आली. परंतु गैरसमज होऊन त्याबाबत अफवा  पसरल्यामुळे एक भितीचे वातावरण निर्माण झाले होते म्हणून कोणीही आशा प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, अफवा पसरविण्यात कारणीभूत होऊ नये लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल अशी पोस्ट, बातम्या पुरव्या निशी, खात्रीशीर माहिती असल्या शिवाय पसरवू नये. वृत्तपत्रे व समाज माध्यमातून प्रसिद्ध झालेल्या अफवा मुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊन भीतीचे वातावरण निर्माण होत आहे करिता कोविड १९ (कोरोना )साथरोगा विषयी कोणतीही माहिती अथवा बातमी प्रसिद्ध करताना त्याची खात्री करूनच प्रसिद्ध करावी खात्री शीर बातमी प्रसिद्ध करण्यास पूर्ण मुभा आहे परंतु नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होईल अशी माहिती विनाकारण पसरवू नये माहिती अथवा बातमी खात्री न करता प्रसिद्ध केल्यास व ती खोटी असल्याचे आढळून आल्यास अफवा पसरविणाऱ्या वर साथरोग अधिनियम १८९७ खंड २,३ व ४ मधील तरतूदी नुसार कारवाई करण्यात येईल असे तहसीलदार निखिल धुळधर व वैद्यकीय अधिक्षक डॉ गजानन टारपे यांनी म्हटले आहे.


तहसिलदार निखिल धुळधर यांची प्रतिक्रिया : - चुकीची माहिती पसरविल्यास किंवा प्रकाशित केल्यास साथरोग अधिनियम नुसार कारवाई करण्यात येईल.


वैद्यकीय अधिक्षक डॉ गजानन टारपे यांची प्रतिक्रिया :- कोरोनाला घाबरू नका,प्रशासनाला सहकार्य करा.वेळोवेळी साबणाने हात स्वच्छ धुवा व सार्वजनिक ठिकाणी तोंडाला मास्क चा वापर करा.

Post a comment

0 Comments