औरंगाबाद जिल्ह्यात आज एकूण 197 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर


औरंगाबाद,  : औरंगाबाद जिल्ह्यात आज 342 जणांना (मनपा 188, ग्रामीण 154) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 9680 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 197 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 13566 झाली आहे. आजपर्यंत एकूण 464 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 3422 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 
दुपारनंतर 126 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 34, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 55 आढळलेले आहेत. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे  (कंसात रुग्ण संख्या) आहे. 
*मनपा (25)*
मेहेर नगर (2), जुना बाजार परिसर (1), बारुदगर नाला (1), देवळाई चौक, दत्त मंदिरा जवळ  (1), कोहिनूर कॉलनी (2), टाऊन सेंटर (1) , शहानूरवाडी (1), कुंभारवाडा (1), जागृत हनुमान मंदिर परिसर (1), पैठण रोड (1), बालाजी नगर (1), एन आठ सिडको (2), बजरंग चौक परिसर (1),  एन सहा सिडको (1), विशाल नगर (1), लुनार सो., सिडको (1), बीड बायपास (2), जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, वेलकम झेरॉक्स जवळ (1), मराठवाडा केमिकल इंडस्ट्री परिसर (1), पेडगाव (1), एसटी कॉलनी (1) 
*ग्रामीण (12)*
जामा मस्जिद जवळ, वाळूज (1), बजाज नगर (3), नायगाव (1), गांधी नगर, रांजणगाव (2), भराडी (1),झाकेर हुसेन नगर, सिल्लोड (1), सिल्लोड (1), रांजणगाव (1), वडगाव कोल्हाटी (1)
*सिटी एंट्री पॉइंट (34)*
मिटमिटा (3) , बजाज नगर (4), छावणी (2), पुष्पनगरी (2), बीड बायपास (3), गजानन महाराज मंदिर जवळ (2), हनुमान नगर गल्ली क्र. दोन (1), ब्रिजवाडी (1), गरम पाणी (2), वाळूज (1), बाळापूर (5), गारखेडा (1), शेंद्रा एमआयडीसी (1), कुंभेफळ (1), नारेगाव (1), मोती कारंजा, शाहगंज (1), चित्तेगाव (1), अयप्पा मंदिर, बीड बायपास रोड (2)
*दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू*
घाटीत शहरातील हडको, टीव्ही सेंटरमधील 71 वर्षीय पुरूष, छावणी, गवळीपुऱ्यातील 70 वर्षीय स्त्री कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 
***

Post a comment

0 Comments