वैजापुर पोलिसांनी चोवीस तासात आवळल्या चोरांच्या मुसक्या2,83,000 रुपयांचा माल मुद्देमालासह जप्त,चौघांविरुद्ध कारवाई


वैजापूर (प्रतिनिधी)/राहुल त्रिभुवन

वैजापुर शहरातील डेपो रस्त्यावरील एका किराणा दुकानाचे शटर उचकवून चोरट्यांनी 2,83,000  रुपये लंपास केल्याची घटना 23 जूलै रोजी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.याविरुद्ध वैजापुर पोलिसांनी दबंग कारवाई करत चोवीस तासात चोरांना अटक करून मुसक्या आवळल्या.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  शहरातील दुर्गानगर परिसरातील रहिवासी कारभारी गाडेकर यांचे डेपो रस्त्यावर किराणा दुकान आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २४ जुलैपासून शहरासह तालुक्यात टाळेबंदी करण्यात आल्याने त्यांचे दुकान बंदच होते. या दुकानाच्या समोरच  वास्तव्यास असलेले साक्षिदार हा हा प्रकार बघितल्या नंतर गाडेकर यांनी दिलेल्या चार जणांच्या फिर्यादी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता आहेत. रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास त्यांना आवाज आल्याने त्यांनी बाहेर येऊन बघितले असता त्यांना दुकानाचे शटर उघडे दिसले. यावेळी दुकानात त्यांना चौघेजण दिसले. त्यांनी आवाज दिला असता त्यांनी धूम ठोकली. त्यानंतर साक्षिदार यांनी घटनेची माहिती पोलिसांसह गाडेकर यांना फोन करून सांगितली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक श्रीमती मोक्षदा पाटील,गणेश गावडे,पोलीस उपविभागीय अधिकारी गोपाल राजंनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी पोलीस उपनिरीक्षक रमेश जाधवर,पोउपनी चिमा बोयणे,पोलीस नाईक संजय घुगे व इतर पोलिसांचे एक पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन करून धना राठोड, अजय शेजवळ,दिपक अस्वले,राकेश काकडे या चारही आरोपींना अटक करण्यात आली.विचारपुस केल्यावर आरोपींनि गुन्हा केल्याचे कबुल करून चोरलेले 283000 रुपये काढून दिले.अगदी 24 तासांमध्ये वैजापुर पोलिसांना चोरांच्या मुसक्या आवळण्यात यश मिळाले असून चोरांकडील रक्कम मुद्देमालासह जप्त करण्यात आली आहे.

यामध्ये पोलीस अधीक्षक श्रीमती मोक्षदा पाटील,गणेश गावडे,पोलीस उपविभागीय अधिकारी गोपाल रांजनकर,पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, वैजापूर चे पोलीस उपनिरीक्षक रमेश जाधवर,महिला पोलीस उपनिरीक्षक चिमा बोयणे,सहाय्यक फौजदार शेख,पोलीस नाईक संजय घुगे,राहुल थोरात,शिवाजी मद्देवाड, पोलीस कॉन्स्टेबल विजय खोकड,दिलीप वेलगुडे,वाल्मिक राऊत,धनंजय भावे,विशाल पडळकर,विनोद बनकर,योगेश वाघमोडे,अमोल मोरे,प्रशांत गीते,गणेश पैठणकर,विजय भोटकर,अमोल पठाडे यांनी ही कारवाई 24 तासात यशस्वी रित्या केली आहे.त्यामुळे  पोलीस प्रशासनाच्या या जलद कामगिरी चे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a comment

0 Comments