बोरगाव अर्ज येथील यशवंत विद्यालयाचा निकाल 94.73 टक्के


 फुलंब्री (प्रतिनिधी गजानन इधाटे)

फुलंब्री तालुक्यातील बोरगाव अर्ज येथील यशवंत विद्यालयाचा दहावीचा बोर्ड परीक्षेचा निकाल 94.73 टक्के इतका लागला आहे.
विद्यालयातील दहावीच्या  152 विद्यार्थ्यांपैकी 144 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून  119 विद्यार्थी विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत त्याचबरोबर प्रथम श्रेणीत 22 तर द्वितीय श्रेणीत 3 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. 
यात विद्यालयातून काळे अनिकेत व पवार शिवराज यांनी 93.60% घेत प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर द्वितीय क्रमांक थोरात कल्याण      याने 92 .60% घेत मिळवला आहे. तृतीय क्रमांक तुपे समाधान व बेडके अर्जून व तुषार साबळे यांनी 92.40% घेतले आहे. त्याचबरोबर   
 आढाव प्रशांत,   पोपळघट माधुरी,   साबळे प्रविण,  मेटे सचिन ,   गोराडे रामू ,    फुके बाबासाहेब,  देवरे छाया,   साबळे सागर ,  बिरारे नारायण  या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
या सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे राजर्षी शाहू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पालोदकर,     सचिव प्रा. डॉ.राहुल पालोदक‌र ,        प्राचार्य डॉ.पंडीत सर,    शाळेचे मुख्याध्यापक कळम पी व्ही सर , माजी मुख्याध्यापक पांढरे ए .डी सर,   तसेच सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करुन पुढील महाविद्यालयीन शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

Post a comment

0 Comments