र .ना .राऊत विद्यालय श्रीवर्धन दहावी निकालात 97.98% मिळवित विद्यालयाची गुणवत्ता परंपरा कायम राखण्यात आले यश(रामचंद्र घोड्मोडे )

 श्रीवर्धन

मार्च 2020 मध्ये र .ना. विद्यालय श्रीवर्धन मधून  149 विद्यार्थी  एस एस सी परीक्षेस बसले होते .त्यातील 146 विघ्यार्थी उत्तीर्ण झाले. शाळेचा निकाल 97.98% लागला असून उत्कृष्ट निकालाची परंपरा शाळेने यंदाही कायम राखली आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी शाळा नेहमीच प्रयत्नशील असते.
विशेष बाब म्हणजे विघ्यार्थीच्या या यशासाठी शिक्षकांचे जादा तासांचे आयोजन, सराव पेपर, व मेहनतीचे फळ म्हणून या यशाकडे पाहिले जात आहे.    र.ना .राऊत विद्यालय शिक्षण सभापती जितेंद्र सातनाक .मुख्याध्यापक मा.रवींद्र ढाकने सर यांनी यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे  अभिनंदन केले आहे.  विद्यालयातून 
 पहिला क्रमांक : कुमारी रिया दिपक गायकवाड - 95.60%

दुसरा क्रमांक  -कुमारी स्नेहा संतोष चौकर  93%। 

 तिसरा क्रमांक सलोनी राम नांदीवकर 91.80% 

चौथा क्रमांक स्वराली राजीव पूलेकर 90.20% 

पाचवा  क्रमांक शंकर दत्तात्रय मुंढे 89.40%
विद्यार्थी व पालकांच्या अपेक्षा पूर्णत्वाला नेत मुख्याध्यापक श्री.ढाकने सर यांच्या नेतृत्वात शाळेने गेल्या अनेक वर्षापासून उत्कृष्ट निकाल लावत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. या यशाबद्दल पंचक्रोशीतील ग्रामस्त, पालक व सुजाण नागरिकांकडून शिक्षक व विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.तसेच सर्व यशस्वी विद्यार्थी व त्यांचे पालक,संस्थेचे पदाधिकारी व शालेय समित्या पदाधिकारी,शिक्षक,कर्मचारी,
 तसेच मार्गदर्शक यांचे हार्दीक अभिनंदन व पुढच्या वाटचालीस विघ्यार्थीना शुभेच्छा देन्यात येत आहेत़

Post a comment

0 Comments