प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मुलाने मिळवले यश

ब्रेकिंग न्यूज

महाड : दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे.रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथील विद्यामंदिर पोलादपूर येथे शिकणाऱ्या एका गरीब घराण्यातील प्रेम रायबा जाधव या विद्यार्थ्याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून 10 वीच्या परीक्षेत 83 गुण मिळवून घवघवीत यश प्राप्त केले आहे.प्रेम याची घरची परिस्थिती म्हणजे मोडकळीस आलेले घर आणि वडील मजुरी करून मिळेल त्या मजुरीवर घर चालवत आहेत.परिस्थिती बिकट असल्याने विना क्लास प्रेम याने अभ्यास करून परीक्षा दिली आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केले.


अश्यातच वडील दारूच्या आहारी गेलेलं असताना प्रेम याची शिक्षणाची जिद्द पाहून वडिलांनी दारूचा त्याग करून त्याला प्रोत्साहन करून हवे ते कष्ट करायला मी तयार आहे तू फक्त शिक मी असा शब्द दिल्याने प्रेम याने दिवस रात्र एक करून 10 च्या परीक्षेत 83 गुण मिळवून गावसह आई वडिलांचे नाव मोठे केले.यावेळी प्रेम याला आर्थिक मदतीसाठी संदीप मोहिते यांचे सहकार्य लाभले

प्रतिनिधी :- सुरेश शिंदे सह मराठा तेज रायगड

Post a comment

0 Comments