शेलगाव खुर्दच्या जय भवानी विद्या मंदिरचे 'शंभर नंबरी' यश


 फुलंब्री (प्रतिनिधी ) 

   फुलंब्री तालुक्यातील जय भवानी बहु. शिक्षण प्रसारक मंडळ, शेलगाव खुर्द संचलित, जय भवानी विद्या मंदिर, शेलगाव खुर्द या शाळेने मार्च - २०२० मध्ये पार पडलेल्या एस.एस.सी. परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करून शाळेची गौरवशाली परंपरा कायम ठेवली आहे.
   सदरील परीक्षेमध्ये विद्यालयाचा निकाल १००% लागला आहे. बहुतांश विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य श्रेणीत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
   संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश सुलताने, संस्थेचे संस्थापक सचिव दिगंबर ईधाटे, उपाध्यक्ष नथ्थू इधाटे, संचालक भगवंता इधाटे, प्राचार्य मधुकर पाटील, शेलगावचे सरपंच साहेबराव इधाटे, उपसरपंच लक्ष्मीबाई इधाटे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष साईनाथ इधाटे, शालेय समितीचे अध्यक्ष काकाजी तुपे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
   या जाहीर झालेल्या निकालामधुन 
अक्षय बाजीराव तुपे (९०.८०%) प्रथम, 
कु. सपना कौतिक तुपे (९०.४०%) द्वितीय, 
सोनाजी आजीनाथ तुपे (८९.६०%) तृतीय, 
निखिल जनार्धन तुपे (८९.२०%) चतुर्थ, 
अतुल सोमीनाथ फुके (८८.८०%) पाचवा क्रमांक मिळवून उज्ज्वल यश संपादन केले आहे. विशेष प्रावीण्यासह ३६, प्रथम श्रेणीत ०८, द्वितीय श्रेणीत ०१ विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत.
   गुणवंत विद्यार्थ्यांचे प्राचार्य मधुकर पाटील, पर्यवेक्षक कृष्णा गावंडे, बाबासाहेब भोकरे, दीपक काकडे, प्रभाकर ठोंबरे, रामदास नावळे, प्रा. निवृत्ती कोंडके, प्रा. गजानन तायडे, एकनाथ मेटे, मनोज सोनवणे, सचिन शिंदे, विष्णुराम गुंजाळ, पद्मा खरात, सुशील पवार, सुरेश इधाटे, गणेश तुपे, दादाराव इधाटे आदींनी अभिनंदन केले आहे.

Post a comment

0 Comments