बदक खाल्ला कुत्र्याने अन् मारहाण मालकिणीलाइंदापूर - पाळीव बदक कुत्र्याने खाल्ल्यानंतर झालेल्या भांडणातुन कुत्र्याच्या मालकिणीला बेदम मारहाण करण्यात आली. इंदापूर तालुक्यातील वडापुरी गावात आज सकाळी हा प्रकार घडला.

याप्रकरणी अनिता दयानंद चंदनशिवे (वय ४८) या महिलेने फिर्याद दिली असून चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

शोभा बजरंग चंदनशिवे, बजरंग युवराज चंदनशिवे, अभितजित बजरंग चंदनशिवे आणि अमर बजरंग चंदनशिवे, अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी या घरासमोर बसल्या होत्या.यावेळी आरोपी त्या ठिकाणी कुऱ्हाड घेऊन आले आणि फिर्यादीला शिवीगाळ केली.

फिर्यादीने शिवीगाळ का करता, अशी विचारणा केली असता आरोपींनी तुमच्या कुत्र्याने आमचा बदक खाल्ला, असे म्हणत लाकडी दांडक्याने आणि लाथाबुक्क्यांनी फिर्यादीला बेदम मारहाण केली.

पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक सारंगकर अधिक तपास करीत आहेत.

Post a comment

0 Comments