हिंद स्कॉलर्स माध्यमिक विद्यालयात ऑनलाईन तासिकेचे आयोजन

   

पैठण प्रतिनिधी. विजय खडसन :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद शिक्षण चालू हा प्रोग्राम मार्च 2020 पासून सुरू असतांना दिक्षा अँपद्वारे व्हिडिओ देऊन अध्यापनाचे काम चालू आहे पण याने विद्यार्थी शिक्षक यांच्यात संवाद होत नाही आणि त्यात 10 वीच्या मुलांसाठी नुसत्या व्हिडिओ  नुसार  अध्यापन प्रभावी नसल्याने मुलांचा गोंधळ होत होता व या द्वारे मुले माध्यमिक शालांत परीक्षा 2021 ला सामोरे जाऊ शकत नसल्याने शाळेने विद्यार्थीशी  व पालकांशी संवाद साधूनअँप विषय माहिती दिली व पालकांना ऑनलाईन अध्यापन कश्यापद्धतीने करता येईल व तुमचा सहभाग किती महत्त्वाचा आहे हे सांगितले .शाळेत शहरी तसेच ग्रामीण भागातून एकूण 300 विद्यार्थी शिकतात त्यातील 150 विद्यार्थी ग्रामीण भागातून येत असल्याने ऑनलाईन तासिका घेण्यासाठी अडचण येईल असे लक्षात आले परंतु पालकांनी प्रतिसाद देत सांगितले की आम्ही आपण दिलेल्या वेळेत मुलांसाठी मोबाईल उपलब्ध करून देऊ व त्यानुसार जुलै महिन्यापासून इयत्ता 10 वी च्या  विज्ञान व गणित विषयाचे तास सुरू झाल्याने मुले व पालक अधिकाधिक चिंतामुक्त झाले आहे. तसेच इतर वर्गासाठी शिक्षक शिक्षिका आपल्या आवाजात ऑडिओ क्लीप देऊन मुलांचा अभ्यास घेत आहेत व ग्रुप वर होमवर्क देत आहेत.ऑगस्ट महिन्यापासून  शासनाने दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे 5 वी ते 9 वीच्या वर्गाचे ऑनलाईन तासिकेचे नियोजन केले जाणार आहे.ऑनलाईन तासिकाप्रयोग यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक,विज्ञान शिक्षक गुडदे सर  शिक्षक, शिक्षिका यांनी परिश्रम घेतले.

Post a comment

0 Comments