काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष माणिकराव जगताप यांच्या वाढ दिवसाच्या निमित्ताने महाडच्या ट्रॉम केअर युनिटला ऑक्सिजन युनिटची भेट


प्रतिनिधी :-सुरेश शिंदे 

रायगड 
    काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष माणिकराव जगताप यांचा आज वाढदिवस.  प्रत्येक वर्षी मोठ्या उत्साहात हा वाढदिवस साजरा केला जातो पण यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.  मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याचा वाढदिवस वेगळ्या पध्दतीने साजरा केला.  
        माणिकराव जगताप यांच्या वाढदिवसाच औवचित्य साधुन ऑक्सिजनचे विस सिलेंडर आणि त्यासाठी अवश्यक साहित्याची भेट कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरु असलेल्या महाडच्या ट्रॉम केअर युनिटला देण्यात आली.  या अनोख्या भेटीमुळे कोरोनाग्रस्तांच्या उपचारात मदत होईल असे डॉक्टर भास्कर जगताप यांनी सांगितले तर पुढे प्रत्येक कॉटला पाईपलाईनद्वारे ऑक्सिजन जोडणी करून देणार असल्याचे सांगत रुग्णसेवेसाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचा शब्द महाडचे उपनगराध्यक्ष संदीप जाधव यांनी या प्रसंगी बोलताना दिला.

Post a comment

0 Comments