श्रीराम फूलझळकेचे घव घवित यश.


पैठण .प्रतिनिधी .विजय खडसन:-  नुकत्याच जाहीर झालेल्या दहावी बोर्ड परीक्षेच्या निकालात पैठण येथील आर्य चाणक्य माध्यमिक विद्या मंदिर पैठण येथील श्रीराम पंढरीनाथ फुलझळके  याने निकालात आपला दबदबा कायम ठेऊन पैठण तालुक्यातून उज्वल यश प्राप्त केले आहे . या यश बद्दल श्रीराम फुलझळके चे  पैठण  तालुका स्तरावर सर्वत्र कौतुक होत आहे . पैठण येथील प्राध्यापक पंढरीनाथ फुलझळके यांचा तो मुलगा आहे . त्याने नुक्त्याच जाहीर झालेल्या दहावी बोर्ड परीक्षेत ९८% गुण प्राप्त केले आहेत . तसेच त्याने डॉ . सी .वि . रमण बालवैज्ञानिक मध्येही भरगोस यश प्राप्त केले होते . माध्यमिक शिष्यवृत्ती , एन टी एस  ई , एम टी एस ई , परीक्षेत हि तो यशश्वी झाला होता . संस्कृत या विषयात त्याने १०० गुण प्राप्त केले आहेत . भविष्यात या पुढे त्याला वैद्यकीय शाखेतून शिक्षण पूर्ण करून गोर गरिबांची सेवा करण्याचा मानस त्याने व्यक्त केला आहे . या यश बद्दल त्याचे रोहयो मंत्री संदीपान पाटील भुमरे , पैठणचे नगराध्यक्ष सुरज लोळगे , उपनगराध्यक्षा सौ . सुचित्रा ताई जोशी ,दत्ता गोर्डे सर , महेश जोशी , विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अक्षय पा .शिसोदे डॉ .जयंत जोशी , डॉ . राम लोंढे , मुख्याध्यापिका सौ ज्योती जोशी, मुख्याध्यापक डी. एम . रावस सर , मुख्याध्यापक विघ्ने सर , मुख्याध्यापक भास्कर कुलकर्णी सर , डॉ . किल्लारीकर ,श्री विजय चाटूपळे सर  ,सतीश आखेगावकर , मिटकर सर , लोंढे सर , माळोदे सर , गमे सर , पठाण सर , सरोदे सर , जनार्धन दराडे सर , मनोज गटकळ सर संतोष गव्हाणे सर, चितळे सर ,दौंड सर , गणेश कुलकर्णी सर ,तसेच पैठण मधील सर्व स्तरातील लोकांनी त्याचे भरभरून कौतुक केले आहे .

Post a comment

0 Comments