अब्दुल्लापुर येथील पाझर तलावाची त्वरित डागडुजी करुन संभंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाही चे. तहशिलदार, चंद्रकांत शेळके याच्या कडुन आदेश

 *अनिता पाटील  वानखडे यांच्या प्रयत्नाला आखेर  मिळाले  यश *

 पैठण प्रतिनिधी .विजय खडसन:-
 
पैठण तालुक्यातील अब्दुल्लापुर येथील पाझर तलावाला मुसळधार पावसामुळे गेले तडे,पाझर तलावाची त्वरित डागडुजी करून संबंधित अधिकार्‍यावर कार्यवाही करावी अशी मांगणी राष्ट्रवादीच्या अनिता पा.वानखडे यांनी तहसीलदार .चंद्रकांत शेळके याच्याकडे केली आहे.गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या  मुसळधार पावसामुळे पैठण तालुक्यातील अब्दुल्लापुर येथील पाझर तलावाच्या बांधाला तडे गेलेले असून या तलावाच्या पाण्याखाली जवळपास 200 ते 250 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे. पावसाळ्यात जर मुसळधार पाऊस झाला तर बांध फुटून या संपूर्ण क्षेत्रातील फळ बागा व उभी पिकांची मोठी हानी होईल या तलावामध्ये येणार्‍या पावसाच्या पाण्याचे प्रमाण खुपचं मोठ्या प्रमाणात असतांना देखील संबंधित विभागाने किंवा तालुका प्रशासनाने पावसाळ्यापुर्वी या तलावाची पाहणी करून योग्य वेळी याची दुरुस्ती देखभाल करून घेतली असती तर आज जी परिस्थिती या पावसामुळे तलावाच्या भिंतीला तडे गेले नसते परंतु या प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच या तलावाची धोक्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यातच कोरोना महामारीने देश संकटात सापडला आहे. त्यात परत हे संकट शेतकरी आत्महत्या वाढतील स्थानिक प्रशासनाने या बाबतची संपूर्ण माहिती तात्काळ घेऊन यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे शेतकर्‍यांची मोठी हानी टाळण्यासाठी या बांधाची डागडुजी चे काम तात्काळ करणे गरजेचे आहे.करिता संबंधित अधिकार्‍यांनी या विषयी गांभीर्याने विचार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश द्यावेत. अशी मागणी अनिता पा.वानखडे यांनी तहसीलदार यांच्याकडे ईमेलद्वारे केली होती.या ईमेल ची दखल घेऊन पैठण येथील तहसीलदारांनी लघुपाटबंधारे विभागाला पाहणीचे आदेश देण्यात आले असुन या आदेशाची प्रतिलिपि उपविभागीय अभियंता लघुपाटबंधारे विभागाला पाठवण्यात आले आहे.तसेच याची एक प्रति संबंधित तक्रारदार अनिता पा.वानखडे यांना ईमेल द्वारे देण्यात आली आहे. अशी माहिती त्यांनी ,दैनिक सुर्योदयच्या  प्रतिनिधीशी .बोलतांना सांगितले  आहे.

Post a comment

0 Comments