फुलंब्री तालुक्यात नुकसानग्रस्त पिकाचे पंचनामे सुरू ,सुमारे साडे चारशे हेक्टरवर मका पिकाचे नुकसान

फुलंब्री(प्रतिनिधी गजानन इधाटे)

 फुलंब्री तालुक्यात मागील गेल्या चार पाच दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. या नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्यासाठी विविध संघटनेच्या माध्यमातून पंचनामे करण्याची मागणी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने फुलंब्रीचे तहसीदार सुरेंद्र देशमुख यांनी 24 जुलै रोजी नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त भागात महसूल विभागामार्फत पीक पंचनामे करणे सुरू आहे.
फुलंब्री तालुक्यात दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते. उभे असलेले मका पीक या अतिवृष्टीच्या पावसामुळे जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ आदी संकटे शेतकऱ्यांच्या पाठीशी नेहमीच सुरू असल्याने शेतकरी हैराण झाले आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्यामुळे अनेक शेतकाऱ्यांचे मका व कपाशी पीक तसेच पडून आहे. मात्र तरीही यंदा नव्या उमेदीने शेतकऱ्यांनी खरिपाची लागवड केली होती. परंतु पीक एन जोमात असतांना तालुक्यातील गणोरी, किनग़ाव, वारेगाव, शेलगाव, जानेफळ, वानेगाव, रेलगाव, पिंपळगाव वळण, कान्होरी, निधोना व आड़गाव बु या परिसरात अंदाजे साडे चारशे हेकटर क्षेत्रात पिकांचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे पिकांचे पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांनी मागणी केली होती. त्यामुळे तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी तलाठी यांना आदेशीत केल्याने तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करणे सुरू आहे.  
-----


 *फुलंब्री तालुक्यातील गणोरी जिल्हा परिषद सर्कल मध्ये दोन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते. पंचनामे करण्याची मागणी होताच तालुक्यात तलाठी यांना पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे. मागील दोन तीन दिवसांपासून पंचनामे करणे सुरू आहे* .
- *सुरेंद्र देशमुख, तहसीलदार फुलंब्री*

Post a comment

0 Comments