चार वर्षीय चिमुकलीचा आईने केला खून
सांगवी, पुणे - चार वर्षीय चिमुकली त्रास देत होती म्हणून आईनेच तीक्ष्ण हत्याराने वार करत तिचा खून केला. 

ही घटना आज (सोमवारी, दि. २७) सकाळी सांगवी परिसरात घडली. पोलिसांनी आरोपी आईला ताब्यात घेतले आहे.

सविता दीपक काकडे (रा. सांगवी) असे ताब्यात घेतलेल्या आरोपी आईचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सविता हिच्या सासूचा मागील दहा दिवसांपूर्वी मृत्यू झाला. सासूचा आज दशक्रिया विधी होता. या विधीसाठी घरातील सर्वजण बाहेरगावी गेले होते.

दरम्यान, घरात आरोपी सविता, तिचा सहा महिन्याचा मुलगा आणि मयत चार वर्षीय मुलगी असे तिघेजण होते.

सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सविताने चिमुकली त्रास देऊ लागल्याने तिचे डोके भिंतीवर जोरात आदळले. त्यानंतर तिच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करत तिचा खून केला.

घटनेची माहिती मिळताच सांगवी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपी आईला ताब्यात घेतले आहे.

सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

Post a comment

0 Comments