तेली समाज सामाजिक संघटनेच्या वैजापूर तालुका अध्यक्ष पदी दिपक बरकसे यांची नियुक्ती


 वैजापुर(प्रतिनिधी )/राहुल त्रिभुवन

 औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील तेली समाजाच्या कार्यात नेहमी अग्रेसर असणारे दिपक बरकसे यांची तेली समाज सामाजिक संस्थेचे मोफत वधू वर सूचक मंडळ महाराष्ट्र प्रदेश यांनी तेली समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र या संस्थेच्या वैजापूर तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती  देऊन निवड केली आहे.दिपक बरकसे हे वैजापूर तालुक्यात शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात व तेली समाजाप्रती केलेल्या चांगल्या कामाची पावती म्हणून व त्यांची गुणवत्ता आणि कार्यक्षमता पाहून नियुक्ती केली आहे ,असे पञात नमूद केले आहे.या निवडीबद्दल 
तेली समाजाचे  सिताराम व्यवहारे भानुदास धामणे भगवान व्यवहारे संतोष सोनवणे सुनील पैठण पगारे रत्नपारखी सर दत्ता रोजेकर कमलेश आंबेकर सुनील सोनवणे जगन्नाथ हिरे संजय उचित हरिभाऊ साबणे लहू धामणे अमोल धामणे मयुर आंबेकर शिवकुमार भुजबळ तसेच विविध पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a comment

0 Comments