कोरोनाच्या काळात देखील शिवसेनेत मेगा भरती सुरूच, महाड विधानसभा मतदार संघात काॅंग्रेसला लागली गळती

रायगड

प्रतिनिधी:-सुरेश शिंदे रायगड

माननीय मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन महाड तालुका साकडी येथील काँग्रेसचे महाड तालुका सरचीटनीस आणि साकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तसेच बिरवाडी विभागीय अध्यक्ष गणेश भोसले,यांच्या समवेत साकडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच रेखा शिंदे,माजी उप सरपंच सुजाता सकपाळ,विध्यमान ग्रामपंचायत सदस्या स्मिता भोसले ,शाहीन एजाज ठानगे,प्रदीप नारायण कदम उध्दोजक,सुभेदार जाधव,आणि समाजसेवक जाधव तसेच यांच्या समवेत काॅंग्रेच्या पंन्नास कार्यकर्यांनी  "आमदार भरतशेठ गोगावले ,आणि रायगड जिल्हा युवा अधिकारी विकास गोगावले" यांच्या नेत्रत्वाखाली शिवनेरी या त्याच्या निवासस्थानी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
या पक्ष प्रवेशासाठी उपस्थित रायगड जिल्हा युवा अधिकारी विकासशेठ गोगावले,महाड पंचायत समीतीच्या सभापती सौ ममता गांगन,जिल्हा परीषद सदस्य संजय कचरे,निलेश ताठरे,विभाग प्रमुख दिलीप शिंदे,राजु गोळे दिलीप म्हस्के,युवा सेना पदाधिकरी ईम्रान पठान,शेखर राकाडे,दिपक भोसले,अख्तर पठान,अमर जंगम सचिन मोरे तसेच शिवसेनेचे ईतर आजी माजी पदाधिकरी  ईत्यादी उपस्थित होते,

या वेळी प्रवेशकर्त्यांनी सांगितले की शिवसेनेच्या आणि आमदार साहेबाच्या माध्यमातुन होत असलेली विकास कामे तसेच सर्वसामांन्याची जाणीव असलेला नेतां म्हनुन गोगावले साहेबांच्या कडे पाहिले जाते ऐवढ्या वर्ष काॅंगेस मध्ये राहुन आम्ही खडकावरच पानि टाकत राहीलो,ना आमचा ना आमच्या भागातील मुलांचीकोनतीही कामे झाली नाहीत,फक्त दिली ती खोटी आश्वासनेच काॅंग्रेस नेत्याच्या भुल थापांना आणि खोट्या आश्वासनांना कंटाळुन  आम्ही शिवसेनेत प्रवेश करत आहोत असे सांगितले.

Post a comment

0 Comments