२० हून अधिक वेळा तोडले वाहतूक नियम; दंड चुकवण्यासाठी बदलली चक्क नंबर प्लेटऔरंगाबाद :  वाहतूक नियम वीसहून अधिक वेळा तोडल्याने दंड  भरण्याचे टाळण्यासाठी चक्क दुचाकीची नंबर प्लेट बदलून फसवणूक करणाऱ्या दोघांंना पोलिसांनी अटक केली.

सूरज काशीनाथ  चव्हाण आणि विलास प्रभू चव्हाण, अशी आरोपींची नावे आहेत. वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक मनोज बहुरे हे मंगळवारी पैठणगेट येथे वाहतूक नियमन करीत होते. यावेळी त्यांना एमएच २३ एएल ४९६९ या क्रमांकाची  नोंदणी असलेल्या दुचाकीने सूरज चव्हाण हा  जाताना दिसला. पोलिसांनी त्याला थांबवून त्याच्याकडे लायसन्स आणि दुचाकीच्या मालकीहक्काची कागदपत्रे सादर करण्यास सांगितले. तेव्हा त्याने दुचाकी मालकाला बोलावून घेतले. 

यावेळी आरोपींनी त्यांच्या दुचाकी नंबर प्लेटवर खोटा क्रमांक असल्याचे सांगितले. त्यांच्या दुचाकीचा खरा क्रमांक एमएच २३ एक्यू ८५१७ असल्याचे सांगितले.  दंड भरावा लागू नये म्हणून नंबर प्लेट बदलल्याची कबुली दिली. सपोनि बहुरे यांनी  गुन्हा नोंदविला. 

Post a comment

0 Comments