कल्याणमध्ये गुटखा विक्री आणि खरेदी जोरात ; पोलीस व केडीएमसीचे दुर्लक्षकल्याण - स्थानक परिसरातील पश्चिमेला गुटखा विक्री व खरेदी जोरात सुरू असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

'क' प्रभाग क्षेत्र अधिकारी किशोर कुताडें व पोलिसांच्या कृपाशीर्वादाने गुटख्याची राजरोसपणे विक्री करण्यात येत आहे

४ महिन्यांपूर्वी कल्याण स्टेशन परिसरातील स्कायवॉकवर अनधिकृत बसलेल्या फेरील्यांना अभय देण्याच्या कारणावरून पालिका आयुक्त डॉ.सूर्यवंशी यांनी दोन अधिकाऱ्यांना निलंबित केले होते.

त्यांच्या जागी अतिक्रमण विभागात कार्यरत असलेले किशोर कुताडे यांना क प्रभाग क्षेत्र अधिकारी म्हणून बढती देण्यात आली होती,मात्र त्याच्या आशिर्वादानेच गुटख्याची विक्री व खरेदी सर्रास केली जात आहे

कोरोना महामारीच्या काळात साथरोग पसरवू नये तसेच अवैध धंदे करू नयेत म्हणून राज्य सरकारने पोलिसांना देखील कारवाई करण्याचे अधिकार दिलेले असताना चक्क 'पोलिसां'च्या दुचाकीवरच दुकान मांडून गुटख्याची विक्री व खरेदी होत असेल तर या विक्रेत्यांना पोलिसांचे देखील अभय असल्याचे दिसून येत आहे

सर्वत्र लाचखोरीची कीड लागलेल्या अधिकाऱ्यांना त्यांचा 'कलेक्टर' नियमितपणे हप्ता पोहचवत असल्याचे तेथील नागरिकांनी  दैनिक 'बातमीदार' शी बोलताना सांगितले.

गुटखा विक्री व खरेदी करणाऱ्याविरोधात कारवाई करण्यासाठी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष व दैनिक'बातमीदार'चे उपसंपादक प्रकाश संकपाळ यांनी ठाणे पोलीस आयुक्त,केडीएमसी आयुक्त,ठाणे सहपोलीस आयुक्त,अतिरिक्त पोलीस आयुक्त यांना निवेदन देणार असल्याचे सांगितले.

Post a comment

0 Comments