प्लेग, मिलिबग तेल्या ,रोगाच्या प्रादुर्भाव वाढल्याने डाळींब बागेचे झालेल्या नुकसानीची माजी आमदार डॉ. काळे यांच्या कडून पाहणी.

  औरंगाबाद -जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनामे करत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी आणि पीकविमा मंजूर करावा ही निवेदनाद्वारी मागणी 
औरंगाबाद तालुक्यातील भांबर्डा, जयपूर, दुधड,वरझडी शिवरासह परिसरात प्लेग, मिलिबग रोगाच्या प्रादुर्भाव वाढल्याने   शेतकरी मोठे नुकसान होत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी सतत दुष्काळाचा सामना करत दुष्काळ परिस्थितीवर मात करून उभी केलेली डाळिंब दोन पैसे देण्याच्या परिस्थितीत असताना आशा रोगाच्या थैमानाने वाया जात असल्याने शेतकरी चिंतातुर होऊन नफ्यात तर नाही पण तोट्यात कुठपर्यंत शेती करणार त्यामुळे बागच तोडून टाकण्याची सुरुवात औरंगाबाद तालुक्यात सुरू झाली आहे. 
  भांबर्डा (ता.औरंगाबाद) येथील प्रगतिशील शेतकरी बळीराम पंडितराव काळे यांच्या भांबर्डा येथील गट क्रमांक ९६ मधील डाळिंब बागेला दोन वर्षापासून फळेचे नुकसानीमुळे योग्य भाव आणि प्लेग, मिलिबग रोगाच्या प्रादुर्भावाने माल व्यापारी घेण्यास नकार देतात, त्यात पिकाची नापिकीचे संकटाला कंटाळून  १० वर्षाच्या उभा असलेले डाळींब बागे जेसीबी घालून बाग उखडून टाकल्याची धक्कादायक प्रकार घडला होता. या शेतकऱ्यांची व्यथा लक्षात घेत आशा शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सोमवार दि.२७ जुलै रोजी माजी आमदार डॉ कल्याण काळे यांनी कृषी विभाग आणि महसूल विभाग पूर्ण टीम घेऊन तालुक्यातील जयपूर, वरझडी,भांबर्डा या गावांचा दौरा करत डाळींब फळबागेची पहाणी केली. यावेळी  जिल्हा परिषद अध्यक्ष मीनाताई शेळके, जिल्हा कृषी अधिक्षक डॉ.तुकाराम मोटे, जिल्हा कृषी विकास अधिकारी आंनद गंजेवार, तहसीलदार कृष्णा कणागुले, तालुका कृषी अधिकारी हर्षदा जगताप, एनएआरपी शास्त्रज्ञ डॉ.गजेंद्र गजताप, मंडळ कृषी अधिकारी लक्ष्मण काळे,कृषी पर्यवेक्षक बाळासाहेब निकम,सभापती छाया राजू घागरे, कृषी सहाय्यक संजीव साठे, ग्रामसेवक अनिल केंद्रेकर यांच्यासह सर्वांनी या बागेची पहाणी केली. कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ डॉ.गजेंद्र जगताप यांच्यासह कृषी विभागाच्या टीमने फळबागेवर थैमान घातलेल्या रोगामुळे चिंता व्यक्त केली तसेच काही मार्गदर्शन करत शेतकऱ्यांना दिलासा दिला. तसेच माजी आमदार डॉ कल्याण काळे यांनी संबंधित प्रशासनाला  या शेतकऱ्यांच्या फळबागांचे होणारे नुकसान लक्षात घेता पाहणी करून त्याना नुकसान भरपाई पीक विमा मंजूर करावा अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली.

Post a comment

0 Comments