ऊजाड माळरानावर नंदनवन फुलवनारा वृक्षमित्र चंद्रकांत वारघडे

निलेश जांबले
दौंड-पुणे
बकोरी येथील गायरान गट नंबर१६० मध्ये उजाड माळरानावर माहिती सेवा समिती व दादा बाबाजी वारघडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून चंद्रकांत वारघडे व त्यांचे सहकारी इतर थसहयोगी संस्थांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी वृक्ष लागवड करत आहेत. आज अखेर त्या ठिकाणी वीस हजार झाडांची ची लागवड केली गेली आहे.  त्याचे संगोपन वारघडे कुटुंबातील सदस्य रोज झाडांना पाणी देऊन किंवा झाडातील गवत काढणे, आळी करणे ,अशा प्रकारची कामे नियमित करत असतात "वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी" या संत तुकाराम राम महाराज यांच्या ओवी मध्ये पर्यावरणाचे महत्व सांगितले गेले आहे १६३५  ते ४०  च्या दरम्यान याठिकाणी  पर्यावरणाचे महत्त्व या ओवीतून महाराज सांगत आहेत परंतु आपण त्याकडे लक्ष देताना दिसत नाही.
अनेक संस्था  किंवा शासन हे फक्त एक दिवसापुरता पर्यावरण दिन साजरा करून त्या ठिकाणी थोडीफार वृक्षांची लागवड केली जाते ,परंतु लागवड केलेल्या वृक्षाचे संगोपन करण्यासाठी उदासीनता दिसून येत आहे .मात्र बकोरी ता .हवेली येथील चंद्रकांत वारघडे यांनी बकोरीच्या गायरान डोंगरावरती माहिती सेवा समिती व दादा बाबाजी वारघडे प्रतिष्ठान व इतर सहयोगी  संस्था यांचे माध्यमातून 22 मार्च 2017 रोजी चंद्रकांत वारघडे यांचे जन्मदिवसाच्या निमित्ताने  सुरू केलेले काम आजुनही नियमित चालू आहे. त्या ठिकाणी २००००  झाडांची लागवड करून खऱ्या अर्थाने नंदनवन फुलवले आहे. केवळ लागवड न करता केलेल्या वृक्षांचे नित्यनेमाने मुलगा धनराज व मुलगी धनश्री हे रोज झाडांना पाणी देऊन झाडांची देखभाल करत असतात. पर्यावरणाच्या दिवशी खड्डे खोदून झाडे लावून पाणी टाकायचे असे न करता संपूर्ण वारघडे परिवार यांनी तीन वर्षापासून वृक्ष लागवड करून त्याची देखभाल करणे हाच वसा घेतला आहे. असे म्हनने वावगे ठरणार नाही .
     आम्ही लोकसहभागातून त्याठीकाणची येथुन पुढे ५ लाख झाडे लावणार असल्याचे चंद्रकांत वारघडे यांनी सांगितले .अनेक वाढदिवस त्याठीकाणची वृक्षरोपण करूण साजरे करण्यात आले .अनेक संस्थांनी वृक्षरोपणासाठि सहकार्य केले आणि येथुन पुढे अशा प्रकारे प्रतेकाने सहकार्य करावे व ५ लाख झाडात एक तरी झाड लावावे असे आवाहन वारघडे यांनी केले .

Post a comment

0 Comments