वैजापुरात दुकानाचे शटर उचकवून ५४ हजार रुपये लंपास


वैजापूर (प्रतिनिधी)/
शहरातील डेपो रस्त्यावरील एका किराणा दुकानाचे शटर उचकवून चोरट्यांनी ५४ हजार रुपये लंपास केल्याची घटना २५ जूलै रोजी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. .
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  शहरातील दुर्गानगर परिसरातील रहिवासी कारभारी गाडेकर यांचे डेपो रस्त्यावर किराणा दुकान आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २४ जुलैपासून शहरासह तालुक्यात टाळेबंदी करण्यात आल्याने त्यांचे दुकान बंदच होते. या दुकानाच्या समोरच व्यापारी परेश कोठारी वास्तव्यास आहेत. २५ जूलै रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास त्यांना आवाज आल्याने त्यांनी बाहेर येऊन बघितले असता त्यांना दुकानाचे शटर उघडे दिसले. यावेळी दुकानात त्यांना चौघेजण दिसले. त्यांनी आवाज दिला असता त्यांनी धूम ठोकली. त्यानंतर कोठारी यांनी घटनेची माहिती पोलिसांसह गाडेकर यांना फोन करून सांगितली. त्यानंतर गाडेकर यांनी दुकानात जाऊन तपासणी केली असता त्यांची 54 हजार रुपयांची रक्कम गायब झालेली दिसली. याप्रकरणी कारभारी गाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्यांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a comment

0 Comments