एटीएममधून लाखोंची रोकड काढणारी बिहारी टोळी जेरबंद


औरंगाबाद : शहरातील विविध १३ एटीएममध्ये डिव्हाईस टाकून लाखो रुपये काढून फसवणूक करणाऱ्या बिहारी टोळीला सायबर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. या टोळीला शनिवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

याविषयी प्राप्त माहिती अशी की, काही दिवसांपासून औरंगाबाद शहरातील पडेगाव येथे आलेले बिहारी तरुण शहरातील विविध एटीएम सेंटरवर पैसे काढण्यासाठी जातात. यानंतर ते एटीएममधून डिव्हाईस मशिनच्या आधारे  मोठी रक्कम काढत असल्याची माहिती खबऱ्याने सायबर पोलिसांना दिली.

पोलीस उपायुक्त मीना मकवाना, सहायक आयुक्त  डॉ. नागनाथ कोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गीता बागवडे, कॉन्स्टेबल सुशांत शेळके आणि कर्मचारी यांनी चार आरोपींना पडेगाव परिसरात पकडले. त्यांच्याजवळ मोठ्या संख्येने सीमकार्ड आणि एटीएम कार्ड मिळाले. काही दिवसांमध्ये त्यांनी शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या ११, तर अन्य बँकेच्या दोन एटीएममधून सुमारे अडीच लाख रुपये काढले. याशिवाय ही टोळी नागरिकांना नोकरी, लॉटरी लागल्याचे आमिष दाखवून फसवणूक करीत असते, असे समोर आले. 
 

Post a comment

0 Comments