हुलजंती येथील जवान नागप्‍पा म्हेत्रे यांना जम्मू काश्मीर येथे वीरमरणसोलापूर -जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथील जवान नागप्पा सोमन्ना म्हेत्रे (वय 34) यांना वीरमरण आले. सेवा बजावत असताना छातीत दुखत असल्याच्या कारणामुळे शनिवारी रात्री जम्मू काश्मीरमधील हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते.


हुलजंती (ता.मंगळवेढा) येथील जवान नागप्पा म्हेत्रे (वय 34) हे शनिवारी रात्री जम्मू काश्मीर  येथे सेवा बजावत असताना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले असल्याने सहकाऱ्यांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असून कोरोना तपासणीनंतर त्यांचे पार्थिव मूळ गावी हुलजंती गावात सोमवारी येण्याची शक्यता आहे.

नागप्पा म्हेत्रे हे 2011 मध्ये सैन्यात भरती झाले होते. गेली दहा वर्षे ते सैन्यात सेवा बजावत होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण हुलजंती तर महाविद्यालयीन शिक्षण बालाजीनगर येथील आश्रमशाळा येथे झाले. मोठ्या कष्टाने ते सैन्यात भरती झाले होते.

त्यांच्या पश्चात आई,दोन भाऊ,तीन बहिणी,पत्नी व दोन मुली असा मोठा परिवार आहे.गावातील मित्र परिवार आणि गावकऱ्यांसोबत त्यांचा जिव्हाळा होता.संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच गावात शोककळा पसरली असून, मंगळवेढा तालुक्यातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

Post a comment

0 Comments