अन्वी येथे श्रावन सोमवारी बेल वृक्षारोपण -अभिनव प्रतिष्ठानचे बिल्व पत्र न तोडण्याचे आवाहन

                       सिल्लोड-पंरपरागतरित्या श्रावन सोमवारी भगवान शंकरास बेलपत्र तोडून ते अर्पण करण्याची प्रथा आहे.कोणत्याही झाडाची पाने ही त्यासाठिअन्न बनवन्यास आवश्यक असतात,त्या शिवाय ते वाढू शकत नाही.बेल वृक्षास धर्मशास्त्र, पर्यावरन व औषधी विश्वात अनन्यसाधारण महत्व आहे. त्रिनेत्रस्वरूप असणारे याची पाने त्रिनेत्रधारी महादेवास म्हणुन प्रिय आहे. सिल्लोड येथील अभिनव प्रतिष्ठानच्या वतीने सदस्या व नगरसेविका अश्विनि पवार यांनी आज दि.27 जुलै रोजी,श्रावन सोमवारचे औचित्य साधत अन्वी येथे बेल वृक्षारोपण करून पर्यावरन संवर्धन व शिवपूजनाचा वेगळा संदेश जगास दिला आहे.  महिलांनी बेलपत्र तोडून ते अर्पण न करता श्रावनात एक तरि बेलाचे झाड़ जिथे योग्य जागा असेल तिथे लावावे. महादेव हे धरतिचे पालनहार असून धरतीच्य उदरात बेल रोप लावणे ही खरी शिव व निसर्गपूजा आहे. बेल हा स्थानिक ,औषधी, वातवरण शुद्ध करणारा ,अधिक ऑक्सीजन हवेत सोडनारा वृक्ष आहे. प्रदुषणामुळे शंकराचा तीसरा  डोळा हळूहळू उघडत आहे. बेलपत्रातुन निघनारा सुगंध वातावरणातिल सर्व विषाणू, जीवाणु यांचा नाश करतो असा उल्लेख आयुर्वेदात आहे.चित्रा नक्षत्राचा हा आराध्य वृक्ष आहे➖ अश्विनी पवार, नगरसेविका, सिल्लोड            यावेळी पूजा चापे, कोमल चापे, अर्चना उबाळे,रेखा चापे,मयुरी चापे ,मनीषा बांबर्डे, ताई चापे, कविता  चापे, कल्पना गायकवाड,छाया चापे आदी महिला उपस्थित होत्या व प्रत्येकिने पूजन करून आपापल्या शेतात बेल रोप लावले.

Post a comment

0 Comments