अतिवृष्टी मुळे फुटलेल्या रस्त्याचे अभियंता जाधव यांनी वाळूच्या गोण्यानी केले ब्यारिगेट तयार


 फुलंब्री (प्रतिनिधी गजानन इधाटे)

फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार ते जतेगाव फाटा हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून 2017 मध्ये झालेले होते.

वडोद बाजार च्या पुढे थोडया दूर अंतरावर रस्ता एका बाजूने दिनांक 24 तारखेला झालेल्या अतिवृष्टी मुळे पूर्णपणे खचला होता त्यामुळे त्या ठिकाणी वाहन जाण्यासाठी वाहन चालकाना खचलेल्या रस्त्याचा अंदाज घेता येत नव्हता,तसेच त्या ठिकाणी अपघात होण्याची दाट शकता होती.
 
सदरील माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता जाधव यांना कळताच त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पहाणी केली व दिनांक 26 या दिवशी त्या ठिकाणी दिवसभर थांबून खराब सिमेंट गोण्या मधी वाळू भरून त्या गोण्याचे ब्यारिगेट त्यांनी तयार केले जेणे करून येणाऱ्या वाहनाला कळेल की ह्या ठिकाणी रस्ता खचलेला आहे व त्या ठिकाणी आपघात होण्यापासून वाचेल.

प्रतिक्रिया
 अभियंता जाधव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून 2017 मध्ये ह्या रस्त्याचे काम झाले आहे 24 तारखेला झालेल्या अतिवृष्टी मुळे रस्ता खचला आज त्या ठिकाणी जाऊन गोण्याचे ब्यारिगेट तयार केले व उद्या त्यावर मुरुम टाकून रस्ता पूर्वी प्रमाणे करण्यात येईल.

Post a comment

0 Comments