पोउपनी रमेश जाधवर यांची सापाची तस्करी करणाऱ्या विरुद्ध दबंग कारवाई

वैजापूर(प्रतिनिधी)/राहुल त्रिभुवन


दुर्मिळ मांडूळ प्रजातीच्या सापाची तस्करी करणाऱ्या दोन युवकाला वैजापुर पोलिसांनी नांदगाव चेक पोस्ट वर अटक केल आहे. या सापाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लाखां रुपए मधे किंमत आहे.रोहित रामदास पवार (22 हिरावाड़ी सेक्टर 3 गोकुलवाटिका सोसायटी पंचवटी नासिक) रोहित राजेंद्र पवार (19 मालवे चौक पंचवटी कारंजा नासिक) असे या आरोपीचे नाव आहे. आरोपी हे बुधवारी वैजापुर नाशिक राष्ट्रीय महामार्ग द्वारे येवला कड़े मोटरसायकल वर जात होते.त्या दरम्यान नांदगाव चेक पोस्ट वर वाहन तपासणी वेळी मांडुळ आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक रमेश जाधवर व रज्जाक शेख, शिवाजी मदेवाड, धनंजय भावे, राहुल थोरात,आणि इतर कर्मचारी व अधिकाऱ्यांनी आरोपीला अटक केली.यावेळी त्याच्याकडून सव्वा तीन फुट लांबीचा,दीड किलो वजनाचा मांडूळ साप,एक मोटरसायकल, दो मोबाइल असा 85 हज़ार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.वैजापुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a comment

0 Comments