पुरात वाहून जाणाऱ्या तरुणाला आपला जिव धोक्यात घालून वाचवणाऱ्या तालुक्यातील अंधारी येथील तरुणा चा सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्याचे वतीने प्रशस्ती पत्र देऊन गौरव

सिल्लोड,  पुरात वाहून जाणाऱ्या तरुणाला आपला जिव धोक्यात घालून वाचवणाऱ्या तालुक्यातील अंधारी येथील तरुणांना सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्याचे वतीने प्रशस्ती पत्र देऊन गौरव करण्यात आला. सोमवारी ग्रामीण पोलिस ठाण्यात उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंढे, सहायक पोलिस निरीक्षक किरण बिडवे यांच्या हस्ते प्रशस्ती पत्र देण्यात आले.


       शनिवारी (दि. 25) अंधारी येथील भोरडी नदीला आलेल्या पुरात एक पंचवीस वर्षीय तरुण वाहून जात होता. तरुणाला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली, पण कुणीही वाचवण्यासाठी प्रयत्न केले नाही. याच दरम्यान अक्षय विंध्वस, नवनाथ तायडे यांनी गर्दी पाहून नदीकडे धाव घेतली. तेंव्हा तरुण पुरात वाहून जात असल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ जिवाची पर्वा न करता पुरात उड्या मारल्या व सदर तरुणाला जीवदान दिले.


       त्यांनी दाखवलेले धाडस व स्वतःचा जिव धोक्यात घालून तरुणा दिलेले जिवदान याची दखल घेत ग्रामीण पोलिसांच्या वतीने त्यांना प्रशस्ती पत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी सहायक पोलिस उपनिरीक्षक विकास आडे, विष्णु पल्हाळ, विलास सोनवणे आदी उपस्थित होते.

Post a comment

0 Comments