पंढरपूर तहसिल कार्यालयासमोर विद्याथ्याच्या विविध मागण्यासाठी आमरण उपोषण

पंढरपूर -
विद्यार्थी हिताकडे डोळेझाक करून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करत असलेल्या UGC व केंद्र शासनाच्या विरोधात आमरण उपोषण पंढरपूर तहसील कार्यालय येथे विद्यार्थी वाचवा संघटनेचे प्रदेश संघटक मा. किरणराज पुरुषोत्तम घोडके यांनी पुकारलेले आहे.
अंतिम वर्षातील विद्याथ्याच्या परिक्षा रद्द झाल्या पाहिजे,एटीकिटी तसेच बँकलाँकच्या परिक्षा रद्द करून विद्याथ्यांना पुढील वर्षात प्रवेश द्यावा,केंद्र शासन, UGC,आणि महाराष्ट्र शासन यांनी समन्वय साधून विद्याथी हिताचा निर्णय लवकरच जाहिर करावा या मागण्या करण्यात आल्या
तसेच जोपर्यंत विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही तो पर्यत हे अामरण उपोषण असेच सुरू राहील असे मराठा तेजशी बोलताना सांगितले.
यावेळी उपस्थित राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे राकेश साळुंखे, अखिल भारतीय छावा संघटनेचे विकी झेंडे ,पंढरपूर परीट युवक शहराध्यक्ष रामेश्वर साळुंखे, रुपेश भोसले ,सागर चव्हाण ,सोपान काका देशमुख आदी उपस्थित होते.

गणेश गांडुळे मराठा तेज पंढरपूर

Post a comment

0 Comments