सिल्लोड, शहरात बुधवारी तीन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू

सिल्लोड, शहरात बुधवारी तीन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यात एका बँक अधिकाऱ्याचा समावेश असून एकाच दिवशी तिघे दगावल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. आतापर्यंत तालुक्यात कोरोनाने 16 बळी घेतले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

     तालुक्यात दररोज नवीन रुग्ण मिळून येत असून दोन दिवसात 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी 3 रुग्णांचा मृत्यू झाला, तर 4 नवीन रुग्ण मिळून आले. मृत्यू पावलेल्या रुग्णांमध्ये 2 शहरातील तर 1 भराडी येथील रुग्णाचा समावेश आहे. नवीन सर्व 4 रुग्ण हे शहरातील आहे. यात शिक्षक कॉलनी 2, जय भवानीनगर 1, तर आनंद पार्क येथील 1 असे 4 रुग्ण मिळून आले. तालुक्यात रुग्णांची संख्या वाढून 229 झाली आहे. यात शहरातील 81, तर ग्रामीण भागातील 148 रुग्णांचा समावेश आहे, अशी माहिती प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. योगेश राठोड यांनी दिली. 

      कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या अजिंठा येथे बुधवारी एक ही रुग्ण मिळून आला नाही. मंगळवारी तालुक्यातील देऊळगाव वाडी येथे मिळून आलेल्या रुग्णाच्या संपर्कातील लोकांचे स्वब घेण्यात आले होते. त्यांचा आहवाल बुधवारी निगेटिव्ह आला, अशी माहिती डॉ. राठोड यांनी दिली.  

       

         

       

Post a comment

0 Comments