जिल्हाभरातील फळपिकांचे झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी - डॉ कल्याण काळे
औरंगाबाद  :- औरंगाबाद जिल्ह्यातील भांबर्डा, जयपूर, दुधड,वरझडी शिवारासह परिसरात फळपीक डाळींब बागेवर प्लेग, मिलिबग रोगाच्या प्रादुर्भाव वाढल्याने  आणि सतत धार पावसाने फळगळ होऊन मोठे नुकसान होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेली पीक १००% टक्के वाया गेलेलं असून प्रशासनाने यांची दखल घेऊन तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून जोर धरू लागली होती. त्यांची औरंगाबाद जिल्हाचे कॉग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांनी या शेतकऱ्यांची व्यथा लक्षात घेत आशा शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सोमवार दि.२७ जुलै रोजी जिल्ह्यातील भांबर्डा, दुधड,बनगाव,जयपूर, वरझडी यासह विविध गावांचा दौरा केला. यात कृषी विभाग आणि महसूल विभाग अधिकाऱ्यांना घेऊन  या गावांचा दौरा करत डाळींब फळपिक बागेची पहाणी केली. यावेळी  जिल्हा परिषद अध्यक्ष मीनाताई शेळके, जिल्हा कृषी अधिक्षक डॉ.तुकाराम मोटे, जिल्हा कृषी विकास अधिकारी आंनद गंजेवार, तहसीलदार कृष्णा कणागुले, तालुका कृषी अधिकारी हर्षदा जगताप, एनएआरपी शास्त्रज्ञ डॉ.गजेंद्र गजताप, मंडळ कृषी अधिकारी लक्ष्मण काळे,कृषी पर्यवेक्षक बाळासाहेब निकम, कृषी सहाय्यक संजीव साठे या सर्वांनी फळपीक  बागांची  झालेल्या नुकसानीची पहाणी केली. कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ डॉ.गजेंद्र जगताप यांच्यासह कृषी विभागाच्या वतीने फळबागेवर थैमान घातलेल्या रोगाबाबत चिंता व्यक्त केली. सदर दौरा झाल्यानंतर जिल्हाध्यक्ष डॉ कल्याण काळे यांनी संबंधित प्रशासनाला फळपीक बागेचे झालेल्या नुकसानी बाबत निवेदन देऊन शेतकऱ्याचे नुकसान लक्षात घेता पाहणी करून त्याना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी निवेदनाव्दारे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी शेतकरी बळीराम काळे,कल्याण पठाडे,सोमनाथ जाधव, शिवनाथ पठाडे, शिवाजी दिवटे,प्रभाकर पठाडे,तुकाराम फुकटे,दिलीप मते,तुकाराम पठाडे, राजू मते,दत्ता पठाडे, शिवाजी मते आदी शेतकरी उपस्थित होते

Post a comment

0 Comments