नुकसान भरपाई चे त्वरित पंचनामे करा - कृषी पदवीधर संघटनेची मागणी

फुलंब्री : (योगेश तुपे तालुका प्रतिनिधी)
फुलंब्री तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पिंकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे याकरिता फुलंब्री तालुका प्रशासनाने त्वरित शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करा अशी मागणी कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी संघटनेच्या वतीने नायब तहसीलदार कचरू काथार व मंडळ अधिकारी सी. एन. गोसावी यांना दिले आहे , या निवेदनात म्हटले आहे की अतिवृष्टीमुळे झालले नुकसान याचे त्वरित पंचनामे करा , शेतकऱ्यांना त्वरित पीककर्ज वाटप करा , पीकविमा ची तारीख आगस्ट 2020 करा, शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा तुटवडा भासू देऊ नये त्वरित युरिया उपलब्ध करून घ्यावा , मका खरेदि करा असे निवेदनात म्हटले आहे यावेळी संघटनेच्या वतीने योगेश जाधव व शुभम साबळे यांनी निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या व यावेळी संघटनेचे पदाधिकारी व तरुण शेतकरी उपस्थित होते.

Post a comment

0 Comments