औंरगाबादमध्ये तरुणाने चक्क रिव्हॉल्व्हर लावून केला लुटण्याचा प्रयत्न



औंरगाबाद : कर्जबाजारी झालेल्या  एका तरुणाने चक्क ओळखीच्याच व्यक्तीच्या घरी जाऊन त्यांच्या मुलावर रिव्हलवर ताणून पैशे लुटण्याचा प्रयत्न केला मात्र घरातील सदस्यांनि प्रसंगावधान राखत त्याच्या हातातील रिव्हलवर हिसकावून त्यास पकडले.ही खळबळजनक घटना आज सकाळी  दिवसाढवळ्या हर्सूल जवळील हरसिद्धी हाऊसिंग सोसायटीत घडली.पोलिसांनी हल्लेखोर तरुणासह गावठी रिव्हलवर ताब्यात घेतली आहे.राहुल रावसाहेब आधाने वय-29 (रा.रांजणगाव, वाळूज) असे ताब्यात घेतलेल्या हल्लेखोरांचे नाव आहे.

या घटने प्रकरणी अधिक माहिती अशी की,

संजय गाडे (रा.हरसिद्धी हाऊसिंग सोसायटी,हर्सूल) हे वाळूज औधोगिक परिसरात एका कंपनी मध्ये जनरल मॅनेजर म्हणून नोकरीस आहे. आरोपी गाडे आणि आरोपी राहुलच्या नातेवाईकांचे चांगले संबंध आहे.मात्र गाडे परिवार मधील कोणीही राहुलला ओळखत नाही.मात्र राहुलला गाडे परिवारातिल सदस्यांची संपूर्ण माहिती होती.गाडे परिवार धनाडय असल्याचे त्याला ठाऊक होते. आरोपी राहुल हा रांजणगाव येथील दूध  डेअरीवर कामाला आहे. त्याच्या वर अनेकांची उधारी आहे. पैशासाठी अनेक जण त्याकडे तगादा लावत होते.पैशे फेडण्यासाठी त्याने चक्क ओळखीच्याच गाडे परिवाराला लुटण्याचा प्लॅन बनविला.आज 
 राहुल शहरातील हर्सूल भागात आला.त्याने गाडे यांचे दार ठोठावले असता गाडे यांच्या लहान मुलाने दरवाजा उघडला त्यावेळी मला गणेश दीक्षित यांनी पाठविले असे सांगून त्याने घरात प्रवेश केला. व काही मिनिटातच त्याने गाडे यांच्या मुलावर गावठी रिव्हलवर रोखली दरम्यान तेथे गाडे यांच्या पत्नी आल्या त्यांनी  आम्ही पैशे देतो अशी थाप मारत वरील खोलीत घेऊन गेल्या तो पर्यंत बाजूच्या खोलीत झोपलेले गाडे व त्यांचा लहान मुलगा दोघेही वरील खोली मध्ये आले.व एकाच वेळी चौघांनी आरोपी राहुल वर हल्ला चढविला या हल्ल्यात त्याच्या हातातील रिव्हलवर खाली पडली. घरातील सदस्यांचा रुद्रावतार पाहून त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र बाहेर बसलेल्या तरुणांनी त्याला पळताना पकडले.ही माहिती पोलिसांनी देताच तातडीने हर्सूल पोलिसांनी राहुल ला ताब्यात घेत त्याच्या जवळील रिव्हलवर जप्त केली.या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांनी दिली.

माझ्यावर उधारी झाली मला 57 हजार द्या..

राहुल ने घरात प्रवेश करताच गाडेच्या मुलाच्या डोक्याला रिव्हलवर लावून माझ्यावर खूप उधारी झाली आहे.पैशासाठी लोक माझ्याकडे तगादा लावत आहे .मला 57 हजार रुपये द्या अन्यथा मी शूट करेल असे राहुल सांगत होता.मात्र त्या रिव्हलवर मध्ये काडतुस न्हवत्या. त्याने रिव्हलवर कोठून आणली याचा पोलीस शोध घेत आहेत..

Post a comment

0 Comments