प्रतिनिधी सुरेश शिंदे
22 तारखेला राज्यसभेमध्ये झालेल्या शपथविधी दरम्यान श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनी शपथविधी ग्रहण केल्यानंतर जय भवानी जय शिवाजी या घोषणा दिल्या या घोषणेला काँग्रेस खासदार मलिकाअर्जुन खर्गे आणि गुलाब नबी आजाद त्यांनी आक्षेप घेतला.त्या काँग्रेस खासदारांचा भारतीय जनता पार्टी पोलादपूर जाहीर निषेध करत त्या खासदारांनी महाराष्ट्राची नव्हे तर संपूर्ण देशातील शिवभक्तांची-शिवप्रेमींची माफी मागावी अन्यथा त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा असे निवेदन आज पोलादपूर तहसील ऑफिस नायब तहसीलदार देसाई यांना पोलादपूर भाजप तर्फे देण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पार्टी पोलादपूर तालुका अध्यक्ष प्रसन्न पालांडे,राजाभाऊ दीक्षित,एकनाथ कासुर्डे,राजेश कदम,समीर सुतार आणि युवा मोर्चाचे युवा नेते महेश निकम उपस्थित होते.
0 Comments