बकर्या चोरी करण्यास आले अन पोलिसांनी पकडले....वीरगाव पोलिसांची कारवाई...


वैजापूर (प्रतिनिधी) /
 
वैजापुर तालुक्यातील महालगाव येथे रविवारी मध्यरात्री पेर्टोलिगं दरम्यान वीरगाव पोलिसांना पाहुन दोन तरुण अंधारात पळाले यावेळी पोलिसांना त्याच्यावर संशय आल्याने वीरगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वास पाटील  यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलिस उपनिरीक्षक अरविंद गटकुळ, प्रशांत दंडेवार, शिवनाथ सरोदे, यांनी सदर संशयित तरूणापैकी एकास पाठलाग करून पकडले  यावेळी सदर तरुणांने अगोदर उडवाउडवीची उत्तरे दिली नतंर  पोलिसांनी खाकी झटका दाखवताच त्याने  आपले नाव प्रमोद नाना रिठे वय २८ रा.आडगाव औरंगाबाद असे सागितंले व त्याचे साथीदार तेजराम श्रीराम राठोड, गणेश विश्वनाथ पठाडे रा.करमाड पोलिस ठाणे हद्दित असल्याचे सांगून तेथुन सदर तरूण टेम्पो क्र. MH 14 CP 6968  घेऊन महालगाव येथे बकर्या चोरी करण्यासाठी आले असल्याचे सांगितले याप्रकरणी वीरगाव पोलिसांनी घटनास्थळावरून एक टेम्पो व प्रमोद रिठे यास ताब्यात घेऊन याप्रकरणी वीरगाव पोलिस ठाण्यात कलम १२२ प्रमाणे  गुन्हा दाखल  करण्यात आला आहे याबाबत पुढील तपास विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलिस उपनिरीक्षक अरविंद गटकुळ, शिवनाथ सरोदे, खंडु मोरे हे करीत आहे...
सदर टोळीतील तेजराम श्रीराम राठोड हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरूध्द करमाड, वैजापुर, शिल्लेगाव, अंजिठा, सिडको नाशिक आदी पोलिस ठाण्यात विविध गुन्हे दाखल असून या चोरट्याच्या शोधासाठी पथके तैनात करण्यात आले असल्याची माहिती वीरगाव पोलिसांनी दिली.

Post a comment

0 Comments