आयकॉन पॅराडाईज इंग्लिश स्कूलचा शिवम बजरंग काळे पैठण तालुक्यातून प्रथम

पैठण -
 आयकॉनची १०० % निकालाची परपरा कायम**   पैठण प्रतिनिधी  विजय खडसन:- विशाल बहुद्देशीय प्रतिष्ठान संचलित आयकॉन पॅराडाईज इंग्लिश स्कूल, पैठण येथील
 *शिवम बजरंग काळे* हा 97.60 टक्के गुण मिळवून इंग्रजी माध्यमातून पैठण तालुक्यातून प्रथम आला आहे. शाळेतून 7 विद्यार्थी 90 टक्याहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाले असल्याचे मुख्याध्यापक आर.बी. रामावत यांनी सांगितले. सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले असून शाळेचा सातव्या वर्षीही शंभर टक्के निकाल लागला आहे. यामुळे इयत्ता दहावी व बारावी मध्ये १०० % निकालाची परपरा कायम राखली आहे. 
    *शिवम बजरंग काळे* याने 97.60 % सह प्रथम, कु.आश्लेषा उत्तम अवधूत 96.40 गुणांसह शाळेतून द्वितीय, कु. मयुरी विजय औटे ही 94% गुणांसह तृतीय आली आहे.
उत्कर्षा राजेभोसले 93%, प्राप्ती पाबळे 92.80 %, श्रावणी तिखे 92.20 %, वैष्णवी अत्रे 91.40%, 
पूजा खनपट 90% गुण मिळवून यशस्वी झाले आहेत. एकूण 44 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह तर 12 विद्यार्थी प्रथम श्रेणी मध्ये पास झाले आहेत. या घवघवीत यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष संतोष तांबे पाटील, कोषाध्यक्ष सौ.शिला तांबे, संचालक प्रतीक्षा गोरडे, अनुराधा गायकवाड, ज्ञानेश्वरी ससाणे चिटणीस सौ.नीता तांगडे, हुमेरा शेख यांनी  अभिनंदन केले आहे. आयकॉन पॅराडाईज इंग्लिश स्कूल & ज्यु.कॉलेज चे मुखाध्यापक आर.बी रामावत, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती एम.के कोळगे, सौ.सारिका धोकटे, सुनील खोलासे, बरकत पठाण, सौ. लता जगताप, सिद्धार्थ औरंगे, प्रा. श्रीराम दास्पुते, अशोक चव्हाण, सौ. आशा अवधूत, सौ.सोनाली गोरे, सौ.माधवी कोष्टी, सौ. कविता दासपुते, सौ.वैशाली गिरगे, हर्षदा मुळे, श्री. अभिजित निंबाळकर, संदीप तांबे, ऋषी नवथर, कैलास देशमुख, राम तांबे, निलेश देशमुख आदींनी उत्तीर्ण विद्याथ्यांचे अभिनंदन केले.

Post a comment

0 Comments