औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समिती च्या परिसरात उभारण्यात आलेल्या शिवस्मारकाचे लोकार्पणऔरंगाबाद ,- महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि प्रत्येक शिवभक्तांचा अभिमान छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य अश्वारूढ स्मारक औरंगाबादेतील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती च्या परिसरात उभारण्यात आले असून या स्मारकाचे लोकार्पण माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय अन्न पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे व बाजार समिती संचालक मंडळाच्या पुढाकाराने हे देखणे स्मारक उभारण्यात आल्याने शेतकरी, व्यापारी, हमाल तसेच या परिसरात येणाऱ्या प्रत्येक शिवभक्ताला शिवरायांच्या विचारांची उर्जा मिळेल असा विश्वास कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे यांनी  बोलतांना व्यक्त केला. औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्रमात यावेळी व्यासपीठावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे, उपसभापती भागचंद ठोंबरे, सचिव व्ही. ए. शिरसाठ,  भाजप जिल्हाध्यक्ष विजय औताडे , आर. आर. फौंडेशन चे अध्यक्ष विनोद पाटील, औरंगाबाद जिल्हा बँकेचे संचालक अभिजित देशमुख, सुहास शिरसाठ, शिवाजीराव  पा थ्री कर  ,रामदास हरणे आदीं सह इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

Post a comment

0 Comments