आडगाव खुर्द येथे टोळधाड दाखल मक्काचे पीक धोक्यात फुलंब्री(प्रतिनिधी गजानन इधाटे)

फुलंब्री तालुक्यातील आडगाव खुर्द या ठिकाणी आज काही टोळधाड ची कीड आढळली त्यामुळे सरासरी शेतकऱ्यांचे मक्का पीक पूर्ण धोक्यात येण्याची चिन्ह दिसत आहे.

 शेतकऱ्यावर काही असो मात्र संकट येते हे मात्र खरं आहे कारण कधी दुष्काळ, तर कधी अतिवृष्टी चे सावट तर कधी लष्कर आळी ,लाला रोग आशा वेगवेगळ्या संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे ,मागच्या वर्षी शेतकरी हा लष्करी आळी ने ग्रस्त झाला होता मात्र या वर्षी शेतकऱ्यांवर टोळधाड चे मोठे संकट उभे राहिले.

या वर्षी शेतकरी पहिला हवालदिल झालेले आहे त्यामध्ये असलेले कोरोना संकट ज्यामुळे  शेतकऱ्यावर आथिक संकटाचा बोजा पडलेला आहे हातात असलेले काम कोरोना मुळे बंद झाले काही जणांनी औरंगाबाद सोडून शेती करण्याच्या पर्यंत केला आज त्या सर्व शेतकऱ्यावर हे आस्मानी संकट आले आहे,ह्या ज्या टोळधाडी मुळे जे मक्का पीक आख्के उदवस्त होते त्या टोळधाडीचा सुरवात ही दिसत आहे.ज्यामुळे शेतकरी परिस्थिती पूर्ण पणे चिंताजनक झालेली आहे.

Post a comment

0 Comments