वैजापुरात शालांत प्रमाणपत्र परीक्षेत दहावीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

वैजापूर(प्रतिनिधी)/राहुल त्रिभुवन


वैजापुर तालुक्यातील खंडाळा केंद्रांतर्गत येणाऱ्या शाळेचा निकाल चांगला लागला असून यावर्षी बोरसर शाळेने केंद्रातून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे.यात जि.प. प्रशाला बोरसरचा निकाल ९५.१६ टक्के,अनंत विद्यालय जानेफळचा निकाल ९५.०८ टक्के, विद्या सागर कन्या प्र.खंडाळा.८४.५० टक्के तर
जि.प. प्र.खंडाळा शाळेचा निकाल ७६.८२% असा लागला आहे.
तसेच वैजापुर शहरातील फुलेवाडी रोड वरील छत्रपती शाहू माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळेचा निकाल शंभर टक्के तर कैलास पाटील माध्यमिक विद्यालय,वैजापूर चा सेमी इंग्रजी माध्यमाचा निकाल 100% तर मराठी माध्यमाचा निकाल 98.33% लागला असून बिलोणी येथील रामेश्वर विद्यालयाचा निकाल 100% लागला आहे.जिल्हा परिषद प्रशाला खंडाळा येथील गौरव पवार व मंगेश वाघचौरे यास 86.20 टक्के, सचिन रामकृष्ण पवार याने द्वितीय क्रमांक पटकावत 80.80 टक्के तर रोहित जानराव यास 79.40 टक्के गुण मिळाले.
 छत्रपती शाहू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय फुलेवाडी रोड वैजापूर या विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये  अनिकेत सोपान चाफेकर याने प्रथम क्रमांक पटकावत 90.80%, महेश राजेंद्र डुकरे यांने द्वितीय क्रमांक पटकावत 89.60% तर तृतीय क्रमांक कुमारी सुप्रिया काशिनाथ सोळसे हिने घेत  87.00% गुण मिळवले,सेंट मोनिका शाळेची शिवानी नारायण शिंदे हिने 86.80 टक्के गुण मिळवले  तर उत्तेजनार्थ संकेत ज्ञानदेव बनकर यास 84.40% गुण मिळाले.बोरसर प्रशालेतील
प्रथम क्रमांक कु.अंजली सोपान पवार हिने 89.40%,
द्वितीय क्रमांक ज्ञानेश्वर डंगारे याने 89.20%,तर तृतीय क्रमांक रोशनी भाऊसाहेब पठारे हिने  89% गुण मिळवले. तर बिलोणी मधील रामेश्वर  विद्यालयातील रुतुजा सोमासे हिस 92.80 टक्के,  शारदा कदम  ला 91.60%, तर गायत्री पवार हिस  91.40 टक्के गुण मिळाले आहे.

मुख्याध्यापक डोंगरे, ई बि गवळी, अरुण शिंदे, कदम,खजुरे,मुख्याध्यापिका कवडे तर शिक्षक अशोक दारवंटे, भिमराव वाठूरे,देवरे,सोपान सोनवणे, सय्यद, प्रकाश त्रिभुवन व इतर शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.

Post a comment

1 Comments

  1. सर्व एस.एस.सी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन बातम्या आपण चांगली आहे

    ReplyDelete