लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी


सिल्लोड दि.२८
जगविख्यात  साहित्यिक साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे साहित्य आजही अजरामर आहे. त्यांच्या साहित्याची रशियासारख्या देशाने दखल घेतलेली आहे. त्यांनी सातासमुद्रापार जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास आपल्या पोवाड्यातून जगासमोर आणणारे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे हे आहेत. मात्र आपल्या भारत देशात त्यांच्या कुठल्याही साहित्याची आजपर्यंत दखल घेण्यात आलेली नाही. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे जनक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी ३५ कादंबऱ्या,१४ लोकनाट्य,१३ कथासंग्रह,१० पोवाडे आणि ०१ प्रवास वर्णन असा अनमोल ठेवा भारत देशाला व संपूर्ण जगाला दिला आहे. साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना शंभराव्या जन्मशताब्दी वर्ष २०२० निमित्ताने मानवहीत लोकशाही पक्ष व संपूर्ण मातंग समाजाच्या विनंतीचा आदर करून जन्मशताब्दी निमित्त केंद्र  सरकारने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे. तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा गौरव म्हणून राज्य सरकारने शिफारस करून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा.  तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात सर्व शासकीय कार्यालयांना शासकीय सुट्टी जाहीर करण्यात यावी.अशा प्रकारचे निवेदन मानवहीत लोकशाही पक्षाचे औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष रमेश सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद जिल्हा कार्याध्यक्ष अशोकरावजी कांबळे व सिल्लोड तालुका संपर्कप्रमुख सखारामजी आहिरे यांच्या वतीने सिल्लोडचे तहसीलदार रामेश्वर गोरे यांना देण्यात आले.यावेळी सिल्लोड तालुका अध्यक्ष नानासाहेब गायकवाड,तालुका युवा अध्यक्ष बाबुराव अहिरे,तालुका उपाध्यक्ष फकीरचंद तांबे,सोशल मीडिया तालुकाध्यक्ष संजय कांबळे, कार्याध्यक्ष विनोद जाधव, रोहीत नाटेकर,पांडुरंग आहिरे, कैलास आरके आदी उपस्थित होते.

Post a comment

0 Comments