श्री श्रेत्र पंढरपूर येथे विश्व वारकरी सेनेचे विविध मागणीसाठी आंदोलन


पंढरपूर/गणेश गांडुळे

                पंढरपूर येथे विश्व वारकरी सेनेचे विविध मागण्यासाठी उपोषण सुरू.
काल रात्री पंढरपूर येथे विठ्ठल मंदिर महाद्वाराजवळ पॉझिटिव्ह रूग्ण निघाल्यामुळे  जागा बदलण्यात आली असून आता पंढरपूर येथील प्रांत अधिकारी कार्यालया समोर विश्व वारकरी सेनेचे ह.भ.प.अरुण महाराज बुरघाटे,विश्व वारकरी सेना संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. तुकाराम महाराज चवरे,विश्व वारकरी सेना राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. जगन्नाथ महाराज देशमुख, विश्व वारकरी सेना राष्ट्रीय युवक अध्यक्ष ह.भ.प.गणेश महाराज शेटे, युवा विश्व वारकरी सेना महाराष्ट्र अध्यक्ष ह.भ.प.तुकाराम महाराज भोसले,विश्व वारकरी सेना राष्ट्रीय प्रवक्ता
ही मंडळी आमरण उपोषणाला बसलेले आहेत.
वारकर्याच्या विविध मागण्या मान्य करण्यासाठी आमरण उपोषण केले आहे.
 संत नामदेव महाराज यांच्या वंशजानी गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावे,गोकुळाष्टमी पासून पन्नास भाविकांना नियम अटी लावून भजन किर्तनाला परवानगी देण्यात यावी,झी मराठी वाहिनीवरील फुबाईफु कार्यक्रमातील निलेश साबळे, ऋषिकेश जोशी ,लीना भागवत यांनी कीर्तन परंपरेचा अपमान केल्यामुळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा,ह भ प निवृत्ती महाराज देशमुख यांच्यावर दाखल केलेला आहे तो गुन्हा मागे घ्यावा, महाराष्ट्रातील देवस्थान नियम अटी लावून उघडे करण्यात यावी,लाऊस स्पीकर चा नियम मंदिर-मज्जित करिता सारखा असावा,या मागणीसाठी विश्व वारकरी सेनाने उपोषणाचा पवित्रा घेतला आहे.
सरकारने वारकऱ्यांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करून त्वरित मागण्या पूर्ण कराव्यात यासाठी वारकरी मंडळी उपोषणास बसली आहे.

Post a comment

0 Comments