महाड एम आय डी सी मध्ये उभारण्यात येणारे कोविड सेंटर संभ्रमात


रायगड  -जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असल्याने प्रशासनाच्या वतीने खबरदारी म्हणून महाड मध्ये कोरोना रूग्णांनान वर उपचार होण्यासाठी प्रशासनाच्या वतीने पावले उचलण्यास सुरूवात झाली आणि महाड एम आय डी सी मधील कारखानदार यांच्या संगन मताने महाड एम आय डी सी मधील के एस एफ या बंद कंपनीच्या काॅलनि मध्ये कोविड सेंटर उभारण्यास सुरूवात झाली जवळजवळ दोन करोड खर्च करून हे कोविड सेंटर उभारणीला सुरूवात झाली आहे त्यात याच एम आय डी सी मधील देवा ड्रील कंपनीने आपले सामाजिक दाइत्व दाखवत १०० बेड आणि अाॅक्सिजन सुविधा पुरविणार असल्याचे आमदार गोगावळे यांनी सांगितले आहे त्यामुळे अद्यावत कोरोना कोविड सेंटर उभे राहाणार यात शंका नाही माञ महाड एम आय डी सी च्या एम एम ऎ संस्थेच्या वतीने सदर कोविड सेंटर हे महाड एम आय डी सी मधील कारखानदार यांच्या सि एस आर फंडातुन उभे करण्यात येत असल्याचे समोर आले असून हे कोविड सेंटर फक्त महाड एम आय डी सी मधील कंपनीचे कामगार आणि त्यांचे परिवार यांच्या साठी मर्यादित असल्याचे समोर आले आहे त्यामुळे महाड पोलादपुर मधील नागरिकांना धक्काच बसला आहे जर एम एम ऎ सि एस आर खर्च करणार असेल आणि देवा ड्रिल कंपनी समजासाठी पुढे आली असेल तर हे कोविड सेंटर कंपण्यान साठी मर्यादित का? असा प्रश्न करत आहेत
माञ या विषयावर महाडचे प्रांत अधिकारी यांच्या जवळ संपर्क केला असता सदर कोविड सेंटर हे
महाड पोलादपुर मधील नागरिकांनसाठी असेल असे सांगितले आहे तर आमदार गोगावळे यांनी आपली प्रतिक्रिया देखील अशीच दिली आहे

प्रतिनिधी सुरेश शिंदे रायगड

Post a comment

0 Comments