शिक्षक भारती संघटनेने जवानांना बॉर्डरवर पाठवल्या 1000 राख्या


वैजापुर(प्रतिनिधी)/राहुल त्रिभुवन

शिक्षक भारती संघटना नेहमी वेगवेगळे सामाजीक उपक्रम राबवत असते . शिक्षक भारती महिला आघाडी वैजापूर तर्फे दर वर्षी बॉर्डरवर जवानांना राख्या पाठवल्या जातात.या वर्षी ही महिला आघाडीने 1000 राख्या पाठवल्या आहेत.तसेच दिनांक 2 ऑगस्ट रोजी शिक्षक भारती महिला आघाडी यांनी वैजापुर मधील पोलीस प्रशासन व आरोग्य प्रशासन येथिल कोरोना योध्याना कोरोना विरुद्ध लढताना बळ मिळावे या साठी राखी नावाचे कवच म्हणजे रक्षाबंधन या सणानिमित्त राख्या देऊ केल्या.वैजापुरात गेल्या महिना भरापासून कोरोनाचे तांडव सुरू असून येथील पोलीस प्रशासन व आरोग्य प्रशासन आपल्या जिवाची पर्वा न करता शहरांसाठी  कोरोना योध्ये म्हणून लढत आहे.डोळ्यांना दिसू न शकणाऱ्या  कोरोना नावाच्या शत्रूशी लढण्यासाठी एक प्रेरणा म्हणून शिक्षक भारती महिला आघाडी यांनी वैजापुर येथील पोलीस ठाणे व उपजिल्हा रुग्णालय येथे जाऊन या कोरोना योध्यांचा सन्मान करत राख्या देऊ केल्या.यावेळी वैजापुर येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ गजानन टारपे, इतर आरोग्य सहकारी तसेच मा.नगराध्यक्ष डॉ दिनेश परदेशी, जैन संघटनेचे सामाजिक कार्यकर्ते निलेश पारख व इतर प्रतिनिधी यांची उपस्थिती होती तर पोलीस ठाणे वैजापूर या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक चरभरे, ठाणे अंमलदार जाधव ,पवार व इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते.शिक्षक भारती संघटना वैजापुर मध्ये विविध उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत असते.जसे शाळेला शैक्षणिक साहित्य वर्गणीची माध्यमातून उपलब्ध करून देणे असे अनेक उपक्रम राबविले जातात. पोलीस प्रशासन व आरोग्य प्रशासन यांचा सन्मान करताना यावेळी शिक्षक भारती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष किशोर कदम , जिल्हा संपर्क प्रमुख दत्तात्रय गायकवाड , तालुका अध्यक्ष बाबासाहेब जगताप , अनिल जगदाळे, संतोष सोनवणे, नवनाथ मांडूडे ,साईनाथ शिंदे, संजय पठारे , रविंद्र अनर्थे ,अनिल नाईकवाडी ,
महिला आघाडीच्या विभागीय संपर्क प्रमुख अर्चना त्रिभुवन, जिल्हा कार्याध्यक्ष वैशाली सुरासे , तालुका अध्यक्ष मोनाली आवारे , शीतल पाटील , सारिका देवरे,  अनिता पवार, जयश्री कोळसे , संध्याराणी रहाणे , जयश्री वांढेकर, सुनिता चव्हाण ,
 आदी उपस्थित होते.

Post a comment

0 Comments