फुलंब्री मध्ये 100 कोरोना रुग्णावर उपचार सुरू


 फुलंब्री( प्रतिनिधी गजानन इधाटे)

फुलंब्री तालुक्यामध्ये आज प्रयन्त 190 जणांचे कोरोना रिपोट पॉजिटिव्ह आलेले  आहे.
 सदरील 190 पैकी 84 रुग्ण हे बरे होऊन घरी गेलेले आहे तसेच 6 रुग्ण हे मयत झालेले आहे. व उर्वरीत 100 रुग्णावर उपचार सुरू आहे.आज 16 कोरोना रुग्णांना सुट्टी झाली व आज नवीन 3 रुग्णाची वाढ झालेली आहे. 

आज पर्यन्त रॅपिड टेस्ट 2095 जणांची घेण्यात आलेली आहे,तसेच आता पर्यन्त स्वब 484 जणांचे घेण्यात आले.असे एकूण आज पर्यन्त रॅपिड टेस्ट व स्वब एकूण 2579 घेण्यात आलेले आहे.

आज तालुक्यातील मौजे पिंपळगाव देव येथील येथे आज 33 जणांची रॅपिड टेस्ट केले,त्यामध्ये 2 जणांचे रिपोट हे पॉजिटिव्ह आढळले,तसेच औरंगाबाद येथील सिव्हिल हस्पिटल येथे पिंपळगाव गागदेव येथील एकाचे रिपोट पॉजिटिव्ह आले.

तालुक्यात रॅपिड टेस्ट व स्वब तपासणी संख्या ही वाढविण्यात आलेली आहे ,त्यामुळे पॉजिटिव्ह रुग्ण हे लवकर शोधल्या जात आहेत,आणि होणार प्रसारास प्रतिबंध होत आहे. सदरील माहिती ही आरोग्य तालुका आधिकारी डॉ.प्रसन्न भाले यांनी दिलेली आहे.

त्यामुळे ज्यांना ज्यांना काही लक्षणे असल्यास व काही त्रास होत असल्यास,जास्त सामाजिक संपर्क आणि जोखीम असलेले नागरिक यांनी रॅपिड टेस्ट किव्हा स्वब टेस्टिंग डॉक्टर च्या सल्ल्याने करून घ्यावी,असे आव्हाहण फुलंब्री तहसीलदार ,गट विकास अधिकारी ,वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, पोलीस निरीक्षक, गट शिक्षणाधिकारी,यांनी केले आहे.


रुग्ण आढळून आलेल्या गावामध्ये साथ रोग प्रतिरोधक उपाय योजना सुरू आहे.

Post a comment

0 Comments