औरंगाबाद जिल्ह्यात 14689 कोरोनामुक्त, 4110 रुग्णांवर उपचार सुरू


औरंगाबाद,  :  औरंगाबाद जिल्ह्यात आज 237 जणांना (मनपा 120, ग्रामीण 117) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 14689 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 255 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 19407 झाली आहे.  आजपर्यंत एकूण 608 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4110 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दुपारनंतर 123 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 28, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 39 आणि ग्रामीण भागात 31 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या)आहे.

ग्रामीण (32)
औरंगाबाद (7), फुलंब्री (2), गंगापूर (9), कन्नड (1), पैठण (12), सारा विहार, तिसगाव (1)

मनपा (24)
आदिनाथ सो., चिकलठाणा (3), बालाजी नगर (1), न्याय नगर (1), राज नगर (1), लक्ष्मी कॉलनी, गरम पाणी (2), बजाज नगर (1), महाराज नगर (1), एन आरएच हॉस्टेल (1), हनुमान नगर (1), सोहेल पार्क, आयकॉन हॉस्पीटल परिसर (1), एमजीएम परिसर (1), एन नऊ, प्रताप नगर (1), शिवाजी नगर (1), अन्य (1), नवनाथ नगर, हडको (1), वेदांत नगर (2), उल्का नगरी (2), भानुदास नगर (1), जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर (1)

सिटी एंट्री पॉइंट (28)
एन नऊ, पवन नगर (2), चिकलठाणा (2), गारखेडा परिसर (2), सातारा परिसर (1), झाल्टा (1), मुकुंदवाडी (2), शेंद्रा (1), श्रेय नगर (1), सिल्लोड (4), जय भवानी नगर (2), एन आठ सिडको (2), एम दोन, टीव्ही सेंटर (2), मंगरूळ (1), एन अकरा सिडको (3), इटखेडा (1), नक्षत्रवाडी (1)


दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू
दोन विविध खासगी रुग्णालयात कन्नड तालुक्यातील वांजोळा येथील 72 आणि गंगापूर तालुक्यातील मारोती चौकातील 70 वर्षीय कोरोनाबाधित पुरूष रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Post a comment

0 Comments