औरंगाबाद आज एकूण 226 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर


औरंगाबाद, दि.02  : औरंगाबाद जिल्ह्यात आज 300 जणांना (मनपा 167, ग्रामीण 133) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 10901 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 226 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 14553 झाली आहे. आजपर्यंत एकूण 484 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 3168 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 
दुपारनंतर 150 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 31, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 42 आणि ग्रामीण भागात 59 रूग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
 आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे  (कंसात रुग्ण संख्या) आहे.
*ग्रामीण (62)*
गंगापूर (1), राहुल नगर, दौलताबाद (1), देव्हारी, सोयगाव (1), औरंगाबाद (7), गंगापूर (5), वैजापूर (4), पैठण (19), सोयगाव (24), 
*सिटी एंट्री पॉइंट (31)*
कासलीवाल तारांगण (1), राजीव गांधी नगर (1), नक्षत्रवाडी (1), सुंदरवाडी (1), वाळूज एमआयडीसी (2), धूत हॉस्पिटल कर्मचारी (1), उल्कानगरी (1), भावसिंगपुरा (1), हायकोर्ट कॉलनी (4), आसेगाव (2), हर्सूल (2), सारा वैभव (1), एन अकरा (1), पाचोड (2), देवळाई (1), राम नगर (2), खोडेगाव (1), करमाड (1), पिसादेवी (1), शेंद्रा (1), मयूर पार्क (1), अन्य (2)
*मनपा (15)*
एकनाथ नगर, उस्मानपुरा (1), एनआरएच हॉस्टेल, घाटी परिसर (1), जवाहर कॉलनी (1), स्नेह नगर (1), गुरू लॉन परिसर, बीड बायपास (2), पोलिस कॉलनी, टीव्ही सेंटर (1), गुरूप्रसाद नगर, बीड बायपास (1), विजय नगर, गारखेडा परिसर (1), एमजीएम परिसर (2), सिडको, एन अकरा (4),  
*सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू* 
घाटीत पैठणमधील नवगावच्या 64 वर्षीय पुरूष, शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील राहुल नगरमधील 55 वर्षीय स्त्री, इंदिरा नगर, बायजीपुऱ्यातील 55 वर्षीय स्त्री, जय भवानी नगरातील 40 वर्षीय पुरूष, एन पाच, सिडकोतील 83 वर्षीय पुरूष आणि खासगी रुग्णालयात हर्सुलच्या भगतसिंग नगरातील 51 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
****

Post a comment

0 Comments