मुकुंदवाडीत 24 वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू  औरंगाबाद -राहत्याघरी बेदम मारहाण झाल्याने एका 24 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना मुकुंदवाडी येथील राजनगर भागात घडली. 
मात्र नातेवाईकांचे म्हणणे आणि वैद्यकीय नोंदी मध्ये तफावत येत असल्याने हे प्रकरण संशयास्पद झाले आहे.त्यामुळे शवविच्छेदन अहवालानंतरच हत्या ,अपघात की आत्महत्या  हे स्पष्ट होईल. कविता अमोल साठे वय-24 (रा.गेट क्र.56,राजनगर,मुकुंदवाडी) असे मृत तरुणीचे नाव आहे.
या घटने बाबत अधिक माहिती की, बुधवारी 5 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 2.25 मिनिटांनी शहरातील एका खाजगी रुग्णालयात गंभीर जखमी अवस्थेत कविताला दाखल करण्यात आले होते.तेथे तिला राहत्याघरी मारहाण झाल्याचे कारण नोंद करण्यात आले होते.त्या नंतर त्याची प्रकृती अधिक खालावल्याने शासकीय घाटी रुग्णालयात हलविण्यात आले होते.तेथे उपचार सुरू असताना कवितांच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे धाव घेत कविताला मारहाण झाली नसून तिने गळफास घेतल्याचे सांगितले मात्र खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी मारहाण झाल्याचा टिपणी उपचाराच्या कागदपत्रांवर लिहिली आहे. असे सूत्रांनी  सांगितले.दरम्यान गुरुवारी दुपारी कवितांचा घाटी रुग्णालयात  उपचार सुरू असताना मृत्यू झाला.  आज कविताच्या मृतदेहावर  घाटी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येत आहे.दुपारपर्यंत शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाले नव्हता.त्यामुळे मृत्यूचे खरे कारण समोर आले नव्हते. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद इंगळे यांच्याशी संपर्क साधला असता सध्या या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.शवविच्छेदन अहवाला नंतर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती इंगळे यांनी दिली.

Post a comment

0 Comments