औरंगाबाद जिल्ह्यात आज एकूण 256 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर


औरंगाबाद, दि.04   : औरंगाबाद जिल्ह्यात आज 139 जणांना (मनपा 108, ग्रामीण 31) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 11368 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 256 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 15150 झाली आहे. आजपर्यंत एकूण 493 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 3289 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 
सकाळनंतर 158 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 44, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 39 आणि ग्रामीण भागात 69 रूग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे  (कंसात रुग्ण संख्या) आहे.
*ग्रामीण (71)*
परदेशपुरा, पैठण (1), मोधा बु. सिल्लोड (1), औरंगाबाद (17), फुलंब्री (14), गंगापूर (20), कन्नड (02), सिल्लोड (3), वैजापूर (5), पैठण (8) 
*सिटी एंट्री पॉइंट (44)* 
बजाज नगर (4), बीड बायपास (2), फुले नगर (1), सिद्धार्थ नगर (1), एन नऊ (1),  चित्तेगाव, पैठण (2), रहाटगाव, पैठण (2), कांचनवाडी (1), राम नगर (1), मुकुंदवाडी (1), बिडकीन (1), वाळूज (1), हरिप्रसाद नगर (1), सिडको महानगर (2), रांजणगाव (3), सातारा परिसर (1),  खुलताबाद (1), कानडगाव, गंगापूर (1), राजे संभाजी कॉलनी (1), मयूर पार्क (2), अंबाइ (1), एन बारा (1), नागेश्वर वाडी (1), गोळेगाव, सिल्लोड (4), उत्तरा नगरी (2), जानेफळ (1), पाटोदा (1), एन आठ (1), पिसादेवी (1), चिकलठाणा एमआयडीसी (1)
*मनपा (04)*
विटखेडा (1),  मिलकॉर्नर (1), छत्रपती नगर (1), चिकलठाणा (1)
*सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू* 
घाटीत शिवूरमधील 65, जाधववाडीतील 60 खासगी रुग्णालयांमध्ये संत ज्ञानेश्वर नगरातील 48, बजाज नगरातील 69 आणि गंगापूर तालुक्यातील शेंदूरवाद्यातील 50, रांजणगावातील हनुमान नगरातील 69 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 
*****

Post a comment

0 Comments