वडवाळी गावात कोरोना चे 3 दिवसात 28 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण,सरपंचांच्या मागणी वरून तहसीलदारांनी काढले संपूर्ण वडवाळी गाव बंद करण्याचे आदेशपैठण (प्रतिनिधी विजय खडसन)
पैठण तालुक्यातील वडवाळी गावात कोरोनाने चांगलाच हैदोस घातला असून सोमवारी दुपारी गावात एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला होता, त्यानंतर मंगळवारी 3 व बुधवारी 24, असे तीनच दिवसात 28 रुग्ण वडवाळी गावात आढळून आल्याने ग्रामीण भागात रेकॉर्ड ब्रेक झाला आहे.

वडवाळी गावचे लोकनियुक्त सरपंच गणेश गायकवाड खूप परिश्रम घेत असून, वडवाळी गावात कोरोनाला आळा घालण्यासाठी तहसील व ग्रामपंचायत प्रशासन आटोकाट प्रयत्न करीत आहे.

 विविध उपाय म्हणून सरपंच गणेश गायकवाड यांनी आज शुक्रवारी गावात मालेगावचा काढा गावातील नागरिकांना वाटप करणार असल्याचे  दैनिक सूर्योदयच्या प्रतिनिधीशी  बोलताना सांगितले, 
यापूर्वी ही सरपंचांनी गावात मास्क, सॅनिटाईझर व होमीओपॅथी गोळ्यांचे वाटप करून गावात निर्जंतुकीकरणासह विविध उपाययोजना राबवल्या आहेत.

तालुक्यातील ग्रामीण भागात आतापर्यंत ची सर्वांत मोठी रुग्ण संख्या वडवाळी गावात आढळून आली असल्यामुळे, 
लोकनियुक्त सरपंच गणेश गायकवाड यांच्या मागणी वरून तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आठ दिवस वडवाळी गाव बंद करण्याचे आदेश काढले असून 
काल गुरुवार पासून आठ दिवस संपूर्ण गाव सील करण्यात येत आहे.

तसेच पैठण तालुक्यात काल गुरुवारी नांदर -1, कृष्णपूर - 2, फारोळा - 2,  केसापुरी - 1 हे 6 काल आढळून आलेले रुग्ण आहेत.
पैठण तालुक्यातील आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 446 वर पोहचली असून त्यात 12 मयत झालेले आहेत, तर 293 रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत.

तर कोरोना केअर सेंटर मुलींचे वसतिगृह पैठण येथे - 29,
कोरोना केअर सेंटर चितेगाव येथे - 12, 
व कोरोना केअर सेंटर प्रबोधनी, जायकवाडी उत्तर पैठण येथे - 33 व गृहविलगीकरण - 9 असे एकूण 83 रुग्ण पैठण तालुक्यात उपचार घेत आहेत 

तसेच औरंगाबाद व अन्य ठिकाणी 58 रुग्ण उपचार घेत आहेत....

Post a comment

0 Comments