औरंगाबाद जिल्ह्यात आज एकूण 327 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर


औरंगाबाद, दिनांक 20  :  औरंगाबाद जिल्ह्यात आज 238 जणांना (मनपा 66, ग्रामीण 172) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 14927  कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 327 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 19734 झाली आहे.  आजपर्यंत एकूण 617  जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4190 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दुपारनंतर 207 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 40,  मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 60 आणि ग्रामीण भागात 49 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या)आहे.

मनपा (55)
अहिंसा नगर (1), इंदिरा नगर, गारखेडा (1), नूतन शांतीनिकेतन कॉलनी (1), विश्रांती नगर (1), भारत नगर (1), जटवाडा रोड, शहिद कॉलनी (1), अन्य (1), म्हाडा कॉलनी, एन सात (2), शांती नगर (1), जाधववाडी (2), हर्सुल (1), बायजीपुरा (1), संघर्ष नगर,एन दोन (1), जवाहर कॉलनी (1), रमा नगर (2), राजीव गांधी नगर (5), एसटी कॉलनी (2), भावसिंगपुरा (1), कोमल नगर, पडेगाव (3), इटखेडा (2), जिन्सी आरोग्य केंद्र परिसर, नवाबपुरा (4), न्यू बालाजी नगर (1), भवानी नगर (1), राहुल नगर (7), कांचन नगर, नक्षत्रवाडी (1), प्रोझोन मॉल (4), राधास्वामी कॉलनी, चेतना नगर (2), गुरूदत्त नगर (2), मुकुंदवाडी (1), रेल्वे स्टेशन परिसर (1)

ग्रामीण (52)
औरंगाबाद (22), फुलंब्री (3), गंगापूर (7), कन्न्ड (8), खुलताबाद (1), सिल्लोड (4), सोयगाव (4), जानेफळ, शिऊर वैजापूर (2), बोजगाव, सिल्लोड (1)

सिटी एंट्री पॉइंट (40)
पैठण (1), विहामांडवा (1),गंगापूर (3), लासूर स्टेशन (1), वाळूज एमआयडीसी  (2), रांजणगाव (1), बजाजनगर (1), उल्कानगरी (1), सोयगाव (1), वैजापूर (1), हर्सूल (1), कन्नड (1), सुरेवाडी (1), एन अकरा (1), मयूर पार्क (5), एन बारा, सिडको (1),मिसरवाडी (3), जटवाडा (1), बीड बायपास (1), श्रीकृष्ण नगर (1), पैठण खेडा (5), प्रकाश नगर (1),म्हाडा कॉलनी (3), सातारा परिसर (1), एन सात सिडको (1)

चार कोरोनाबाधितांचा मृत्यू 
घाटीत रांजणगाव शेणपूजी येथील 80 वर्षीय स्त्री, पैठणमधील हमाल गल्लीतील 80 वर्षीय स्त्री आणि खासगी रुग्णालयांमध्ये खंडोबा मंदिर सातारा परिसरातील 68 वर्षीय पुरूष आणि एन पाच, गुलमोहर कॉलनीतील 85 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 
*****

Post a comment

0 Comments